IND W vs ENG W आता भारत-इंग्लंड यांच्यात वनडेचा थरार! कधी अन् कुठं रंगणार सामने? जाणून घ्या सविस्तर

टी-२० मालिकेनंतर वनडेत धमक दाखवण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने इंग्लंडच्या मैदानात टी-२० मालिका जिंकत इतिहास रचला. आता टीम इंडियाचा संघ वनडे मालिका गाजवण्यासाठी मैदानात उतरेल.

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिके खेळवण्यात येणार आहे. स्मृती मानधनासह टीम इंडियातील स्टार महिला क्रिकेटर वनडेसाठी तयार आहेत.

या मालिकेतील पहिला वनडे सामना बुधवारी १६ जुलै रोजी साउथॅम्प्टनच्या मैदानात खेळवण्यात येईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होणार आहे.

भारत-इंग्लंड याच्यातील दुसरा वनडे सामना हा १९ जुलैला लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात खेळवण्यात येणार आहे. हा सामना दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल.

२२ जुलै २०२५ रोजी चेस्टर ली स्ट्रीटच्या मैदानातील तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेसह या मालिकेची सांगता होईल.टी -२० मालिका जिंकल्यावर टीम इंडिया वनडेत धमक दाखवण्यासाठी प्रयत्नशील असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, हा सामना सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली संघाकडून वनडेत स्मृती मानधना (उप-कर्णधार) आणि प्रतिका रावल ही जोडी डावाला सुरुवात करताना दिसेल. याशिवाय हरलीन देओल, जेमिमा रोड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), तेजल हसबनिस, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, शुची उपाध्याय, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड़, सयाली सतघरे यांना इंग्लंडचा दौरा गाजवण्याची संधी असेल.

टी २० मिशन फत्तेह केल्यावर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ वनडे मालिकेतही दबदबा दाखवून देण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

इंग्लंड दौरा गाजवण्यासाठी संघातील प्रत्येक खेळाडू कसून सराव करताना दिसत आहे. टी-२० मालिकेत त्याचा रिझल्टही मिळाला. आता वनडेत तिच धमक दाखवण्यासाठी टीम इडिया उत्सुक असेल.