IND vs ZIM: आज जर टीम इंडियाने कुठलीही चूक केली, तर 'या' ४ खेळाडूंचं करियर धोक्यात

Team India Scenario, IND vs ZIM T20 World Cup 2026: चौथ्या नावाबद्दल विचारात पडाल, पण कारण वाचून तुम्हालाही पटेल

भारतीय संघासाठी झिम्बाब्वे विरूद्धचा सामना खूप महत्त्वाचा आहे. या सामन्यात भारताला केवळ विजय मिळवून चालणार नाही तर मोठ्या फरकाने झिम्बाब्वेला पराभूत करावे लागेल.

भारतीय संघ विश्वचषकाचा गतविजेता आहे. तसेच या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. त्यामुळे झिम्बाब्वेविरूद्ध काहीही चूक झाल्यास चार खेळाडूंची कारकीर्द धोक्यात येऊ शकते.

सध्या भारतात सर्वाधिक टीका अभिषेक शर्मावर होत आहे. त्याने चार सामन्यात केवळ १५ धावा केल्यात, ज्यात तीन शून्य आहेत. त्याला संघाबाहेर केल्यास भारताकडे यशस्वी जैस्वाल हा उत्तम पर्याय आहे.

कर्णधार सूर्यकुमार यादवचा फॉर्म खूपच वाईट आहे. ३५ वर्षांच्या सूर्यासाठी हा विश्वचषक महत्त्वाचा आहे. अमेरिकेविरूद्धची खेळी सोडल्यास तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. अशा परिस्थितीत कर्णधार बदलला जाऊन सूर्याची गच्छंती होऊ शकते.

तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर खेळतो, पण त्याने ५ डावांत ११८च्या स्ट्राईक रेटने १०७ धावाच केल्या आहेत. त्यामुळे तो चांगला खेळ दाखवू शकला नाही, तर त्याची जागा घेण्यासाठी श्रेयस अय्यरसारखा फलंदाज सज्ज असेल.

विश्वचषकात रिंकूने फक्त २९ चेंडू खेळले आहेत आणि पाच सामन्यांमध्ये फक्त २४ धावा केल्या आहेत. आफ्रिकेविरुद्ध तो दोन चेंडूत शून्यावर बाद झाला. त्या फारशी संधी मिळालेली नाही, पण त्याची जागा घेण्यासाठी संघात बरेच खेळाडू आहेत.