Virat Kohli, IND vs SL: भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका आणि त्यानंतर ३ वन डे सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे.
भारतीय संघ २७ ते ३० जुलै या कालावधीत टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर सुरु होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारताचा रनमशिन विराट कोहली पुन्हा एकदा मैदानावर दिसणार आहे.
२, ४ आणि ७ ऑगस्ट रोजी वनडे मालिकेतील तीन सामने रंगणार आहेत. या मालिकेत विराट कोहलीला दोन मोठे पराक्रम करण्याची संधी मिळणार आहे. जाणून घेऊया त्याबद्दल.
श्रीलंकेविरूद्ध आतापर्यंत खेळलेल्या २२ वनडे सामन्यात विराटच्या नावे ४ शतकांसह ८६५ धावा आहेत. मालिकेतील ३ सामन्यात विराटने १३५ धावा केल्या तर तो १००० धावांचा टप्पा गाठू शकतो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळताना रिकी पॉन्टींगने सर्वाधिक २१७ षटकार लगावले आहेत. विराटने (२१४ षटकार) जर या मालिकेत ४ षटकार लगावले तर तो तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजांचा 'सिक्सर किंग' बनू शकतो.