रांची येथील झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात विराट कोहलीनं विक्रमी शतक झळकावले. धोनीच्या मैदानात कोहलीचा जलवा आणि त्याची क्रेझ पाहायला मिळाली.
शतकी खेळीनंतर विराट कोहलीनं खास अंदाजात केलेले सेलिब्रेशनही चर्चेचा विषय ठरला. तो सेलिब्रेशनमध्ये व्यग्र असताना एक चाहता थेट मैदानात घुसून त्याच्या पाया पडल्याचेही पाहायला मिळाले.
भारत-दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराट शतक क्रिकेट चाहत्यांना खूश करणारे असेच होते. त्यात स्टेडियमवरील एका चेहऱ्यावरील आनंद चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.
कोहलीच्या शतकानंतर स्टँडमध्ये उपस्थितीत या सुंदरीच्या रिअॅक्शन चर्चेचा विषय ठरत आहे. कॅमेऱ्यात कैद झालेला हा चेहरा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. जाणून घेऊयात ही मिस्ट्री गर्ल नेमकी कोण आहे त्यासंदर्भातील सिवस्तर
विराट कोहलीचा मोठा चाहतावर्ग आहे. ही तरुणी देखील किंग कोहलीची जबरा फॅन आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडेआधी ती IPL मध्येही विराट कोहलीला चीअर करताना दिसली आहे.
या तरुणीचं नाव रिया वर्मा असं आहे. तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरील प्रोफाइल नेम _bachuuuu असं असून तिच्या फॉलोअर्सचा आकडा हा २.५ मिलियनच्या घरात आहे.
रियाच्या इन्स्टा बायोतील माहितीनुसार, ती फॅशन मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या रुपात आपली ओळख निर्माण करत आहे. इन्फ्लुएन्सर्स!
सोशल मीडियावर ती सातत्याने आपले खास फोटो शेअर करत असते. आता कोहलीच्या शतकानंतर तिच्यावर कॅमेरा फिरल्यामुळे तिच्या फॉलोअर्सचा आकडा आणखी वाढला तर नवल वाटणार नाही.