जवळपास तीन वर्षांनी टीम इंडियात कमबॅक करणाऱ्या वरुण चक्रवर्ती प्रत्येक मॅचमध्ये आपलं नाणं खणखणीत असल्याचे दाखवून देत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने खास विक्रमाला गवसणी घातली. भारताकडून एका द्विपक्षीय टी-२० मालिकेत सर्वाधिक विकेट्स मिळवण्याचा रेकॉर्ड आता त्याच्या नावे झाला आहे.
इथं एक नजर टाकुयात वरुण चक्रवर्तीसह एका टी-२० मालिकेत सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या आघाडीच्या ५ गोलंदाजांच्या कामगिरीवर
वरुण चक्रवर्तीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील ३ सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत. एका मॅचमध्ये त्याने पाच विकेट्सचा पराक्रमही करून दाखवलाय.
आर अश्विन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०१६ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेत अश्विन याने ९ विकेट्स घेतल्या होत्या. एका द्विपक्षीय टी-२० मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा अश्विन पहिला गोलंदाज ठरला होता. वरुण चक्रवर्तीनं आता त्याचा विक्रम मोडित काढला आहे.
२०२३ मध्ये रवी बिश्नोई याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी मालिकेत ९ विकेट्स घेतल्या होत्या.
दीपक चाहर याने २०१९-२० च्या हंगामातील बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत ८ विकेट्स घेतल्या होत्या.
अक्षर पटेल यानं २०२२ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत ८ विकेट्स मिळवल्या होत्या.