Join us  

IND vs SA: तिसऱ्या T20 साठी टीम इंडियात मोठा बदल? संघात होणार 'मॅचविनर'ची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 4:26 PM

Open in App
1 / 5

IND vs SA 3rd T20 Predicted Playing XI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुरुवारी तिसरा टी२० सामना होणार आहे. ३ सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडिया सध्या ०-१ ने पिछाडीवर आहे.

2 / 5

मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या सामन्यातही पावसामुळे खेळाची षटके कमी झाली. आता कर्णधार सूर्यकुमार यादवला शेवटचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची एकमेव संधी आहे.

3 / 5

दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग-11 वर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अशा स्थितीत टीम इंडियात एका मॅचविनर खेळाडूची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.

4 / 5

जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या तिसऱ्या टी२० सामन्यात टीम इंडियामध्ये एक महत्त्वाचा बदल होण्याची दाट शक्यता आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादव टी२० मधील अव्वल क्रमांकाच्या गोलंदाजाला संघात स्थान देऊ शकतो.

5 / 5

दुसऱ्या टी२० सामन्यात स्पिनला पोषक खेळपट्टी असूनही T20 चा नंबर १ चा गोलंदाज संघाबाहेर होता. रवी बिश्नोई नुकताच आयसीसी क्रमवारीत नंबर 1 गोलंदाज बनला आहे. अशा स्थितीत आता तिसऱ्या सामन्यात तो पुनरागमन करेल अशी आशा आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकासूर्यकुमार अशोक यादवभारतीय क्रिकेट संघद. आफ्रिका