आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला

एक नजर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंच्या खास रेकॉर्डवर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत विराट कोहली सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करताना तिन्ही सामन्यात फिफ्टी प्लस कामगिरी करून दाखवली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गाजवत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किंग कोहली आता सर्वाधिक २० वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू ठरला आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १९ वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला होता. हा विक्रम किंग कोहलीनं मागे टाकला आहे.

वनडेत सर्वाधिक वेळा मालिकावीर पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अजूनही सचिन तेंडुलकर अव्वलस्थानी आहे. त्याने वनडेत १४ वेळा मालिकावीर ठरला आहे. कोहलीनं वनडेत ११ व्या वेळी सामनावीर पुरस्कार मिळवला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बांगलादेशचा शाकीब अल हसन तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने १७ वेळा मालिका गाजवली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलीस या यादीत चौथ्या क्रमांकावर असून या दिग्गज अष्टपैलून १४ वळा मालिकावीरचा पुरस्कार जिंकल्याचा रेकॉर्ड आहे.