Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs PAK: रवी शास्त्रींचे बाबर आझमला 'ओपन चॅलेंज', म्हणाले- "पहिल्या ५ चेंडूंमध्ये..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 11:06 IST

Open in App
1 / 10

आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात झालेल्या चर्चेनंतर, पाकिस्तानचा संघ १५ फेब्रुवारीला भारताविरूद्ध खेळणार असल्याचे निश्चित झाले.

2 / 10

एकीकडे हा निर्णय झाला असला तरीही पाकिस्तानचा बाबर आझम फॉर्मशी झुंजत आहे. त्याला सूर गवसण्यासाठी रवी शास्त्रींनी त्याला एक चॅलेंज दिले आहे.

3 / 10

रवी शास्त्री म्हणाले, 'बाबर आझम हा प्रतिभावान आहे. पण सध्या तो अपेक्षांच्या ओझ्याखाली आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या कामगिरीवर होताना दिसतोय.'

4 / 10

'जेव्हा तुम्ही कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर उभे असता तेव्हा ते ओझे तुमच्यावर असते. तुम्ही प्रत्येक वेळी दमदार कामगिरीच केली पाहिजे अशी चाहत्यांची अपेक्षा असते.'

5 / 10

'बाबरने डावाच्या सुरुवातीला पहिल्या पाच चेंडूत मोठे फटके खेळले पाहिजेत. तो बाद होत असेल तरीही त्याची चिंता करत बसू नये. त्याने फटकेबाजी करायला हवी.'

6 / 10

'फलंदाजी करताना मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केले तरच बाबर आझमची फलंदाजी बहरेल आणि त्याच्या धावा वाढतील. फटके कसे खेळायचे ते त्याचे त्याने ठरवावे.'

7 / 10

'गोलंदाज कशी गोलंदाजी करेल, आपल्याला कुठल्या भागात धावा जमवता येतील, कुठे चौकार-षटकार मारणे जास्त सोयीचे पडेल या विचाराने फटकेबाजी केली पाहिजे.'

8 / 10

'फलंदाजी करताना बचावात्मक विचार सोडून दिला तर बाबरला खेळताना खूप हलके वाटेल आणि त्यामुळे कदाचित त्याच्या बॅटमधून मोठे फटके जास्त निघू शकतील.'

9 / 10

'बाबर आझम हा अनुभवी आहे. तो सामना आणि खेळपट्टीनुसार स्वत:ची फलंदाजी बदलू शकतो. पण त्याला हा बदल लवकर करावा लागेल, नाहीतर खूप उशीर होईल.'

10 / 10

'७ ते १६ ही षटके महत्त्वाची असतात. या वेळेत मोठे फटके मारताना जोखीम असते, पण तरीही त्याचा अनुभव पाहता तो ही जोखीम उचलू शकतो', असे शास्त्री म्हणाले.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध पाकिस्तानपाकिस्तानभारतीय क्रिकेट संघरवी शास्त्रीबाबर आजम