Ind vs Pak सामना पावसामुळे रद्द झाल्यास कुणाला फायदा? T20 World Cup मध्ये कुणाचा खेळ खल्लास?

IND vs PAK scenario, T20 World Cup 2026 : श्रीलंका हवामान खात्यानुसार, कमी दाबाचा पट्टा तयार होऊन वादळ व पावसाची शक्यता

भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी टी२० विश्वचषकाचा सामना रंगणार आहे. अनेक अडथळ्यानंतर सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे, पण आता एक वेगळाच नवीन धोका निर्माण झाला आहे.

हा सामना कोलंबोमध्ये होणार आहे. पण श्रीलंका हवामान खात्यानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्यामुळे कोलंबोमध्ये ढगांचा गडगडाट, पाऊस आणि वादळाची शक्यता आहे.

हवामान अंदाजानुसार, रविवारी सकाळी कोलंबोत हवामान उष्ण आणि दमट राहिल, पण दुपारनंतर परिस्थिती बदलू शकते. दुपारपासून संध्याकाळपर्यंत वादळासह पावसाची शक्यता ५० ते ७० टक्के आहे.

संध्याकाळी ७ वाजता सामना सुरू होण्यापूर्वीही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे टॉस आणि सामना सुरू होण्यास विलंब होऊ शकतो किंवा सामन्याचा खेळ कमी षटकांचा होऊ शकतो.

हवामान खात्याने इशारा जारी केला आहे की, आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर पावसामुळे सामना रद्द झाला तर त्याचा फायदा कुणाला होणार, समजून घेऊया.