Join us

IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 18:30 IST

Open in App
1 / 8

भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान विरूद्ध सहज विजय मिळवला. या सामन्याआधी आणि नंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकशी हस्तांदोलन टाळले.

2 / 8

पाक क्रिकेट बोर्डाच्या माहितीनुसार, पाकिस्तानी कर्णधार भारतीय ड्रेसिंग रुमपर्यंत आला पण भारतीय खेळाडूंनी दरवाजा लावून घेतला आणि आपला नकार स्पष्टपणे दर्शवला.

3 / 8

हस्तांदोलन वादाच्या या घडलेल्या प्रकारावरून अनेक संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. याचदरम्यान, एक अशी घटना घडली की रिकी पॉन्टींगला वादावर बोलावेच लागले.

4 / 8

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि पंजाब किंग्जचा हेड कोच रिकी पॉन्टींग याने भारतीय संघाला 'लूजर' म्हटल्याचे पसवले जात होते. पण पॉन्टींगने हे साफ नाकारत पाकिस्तानला झापले.

5 / 8

सोशल मीडियावर दावा करण्यात आला होता की, रिकी पॉन्टिंगने 'स्काय स्पोर्ट्स' वर म्हटले आहे की, हा सामना नेहमीच लक्षात ठेवला जाईल, कारण यात भारत 'लूजर' सिद्ध झालाय.

6 / 8

पुढे असाही दावा केला आहे की, पाकिस्तानी संघाने शेवटी हस्तांदोलन करण्याची इच्छा व्यक्त करून 'खेळभावनेने' स्वत:ला खरा विजेता असल्याचे सिद्ध केले. पॉन्टींगने दावा खोडून काढला.

7 / 8

पॉन्टींगने एक्सवर पोस्ट करत म्हटले, 'सोशल मीडियावर माझ्या नावाने काही टिप्पण्या केल्या जात आहेत याची मला माहिती आहे. मी असे विधान केलेले नाही.'

8 / 8

पुढे पॉन्टींगने पाकिस्तानी चाहत्यांना झापत आणखी एक गोष्ट स्पष्ट केली की, मी आशिया कपबाबत कोणतीही सार्वजनिक टिप्पणी केलेली नाही. त्यामुळे आता पाकिस्तानची बोलती बंद झाली आहे.

टॅग्स :आशिया कप २०२५भारत विरुद्ध पाकिस्तानआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ