Join us

"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 18:37 IST

Open in App
1 / 9

भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान विरूद्ध सहज विजय मिळवला. या सामन्याआधी आणि नंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकशी हस्तांदोलन टाळले.

2 / 9

पाक क्रिकेट बोर्डाच्या माहितीनुसार, पाकिस्तानी कर्णधार भारतीय ड्रेसिंग रुमपर्यंत आला पण भारतीय खेळाडूंनी दरवाजा लावून घेतला आणि आपला नकार स्पष्टपणे दर्शवला.

3 / 9

घडलेल्या प्रकारावरून अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. याचदरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने यासंदर्भात आपले मत व्यक्त केले आहे.

4 / 9

तो म्हणाला, 'भारताने पाकिस्तानचा ज्या पद्धतीने पराभव केलाय, त्यावर मला काहीच सूचत नाहीये. जे घडलं त्यावर मी नि:शब्द आहे. पाकिस्तान फार वाईट हरला.'

5 / 9

'भारतीय संघाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. पण या गोष्टीला राजकीय रंग देऊ नका. क्रिकेट हा खेळ आहेत, त्याला खेळाप्रमाणेच राहू द्या, त्यात राजकारण नको.'

6 / 9

'पाकिस्तानचे जाणकार भारतीय संघाचे कौतुक करत आहेत, ते कुठेही क्रिकेट व राजकारणाची सळमिसळ करत नाहीयेत. या विषयावर आम्हीही खूप काही बोलू शकतो.'

7 / 9

'हस्तांदोलन करायला काहीच हरकत नव्हती. मला वाटतं की हा क्रिकेटचा खेळ आहे. त्यामुळे खेळभावनेचा आदर व्हायला हवा होता, त्यांनी शेक-हँड करायला हवं होतं'

8 / 9

'भांडणं, वादविवाद प्रत्येक ठिकाणी होत असतात. घरातही वाद होतात. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही या गोष्टी राजकीय स्तरावर येऊन याल आणि अशी वर्तणूक कराल'

9 / 9

'माझ्याकडून हे शक्य झालं असतं. मी तिथे असतो तर मी प्रतिस्पर्धी संघाशी हस्तांदोलन केले असते. पोस्टमॅच प्रेझेंटेशनमध्ये सलमान गेला नाही ते त्याने योग्यच केले,' असे अख्तर म्हणाला.

टॅग्स :आशिया कप २०२५भारत विरुद्ध पाकिस्तानशोएब अख्तरभारतीय क्रिकेट संघपाकिस्तानसूर्यकुमार यादव