न्यूझीलंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत टीम इंडिया ३-० ने आघाडीवर आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघ आपली 'बेंच स्ट्रेंथ' आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे.
आज न्यूझीलंडविरूद्ध विशाखापट्टणम येथे होणाऱ्या चौथ्या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर संघात काही महत्त्वाचे बदल करण्याची शक्यता आहे.
अष्टपैलू हार्दिक पांड्याला विश्रांती देऊन त्याजागी श्रेयस अय्यरचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे. तिलक वर्मा अद्याप तंदुरुस्त नसल्याने अय्यरला संधी मिळू शकेल.
दुसरा मोठा बदल गोलंदाजी विभागात दिसू शकतो. अनुभवी फिरकीपटू अक्षर पटेल याला संघात घेऊन त्याजागी वरुण चक्रवर्तीला प्लेइंग इलेव्हनमधून विश्रांती दिली जाऊ शकते.