अंधश्रद्धा की 'अपशकुन'? T20 World Cup फायनलआधी टीम इंडियानं बदलला मुक्काम! कारण...

अहमदाबाद येथील २०२३ च्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमधील दारुण पराभवचे ‘भूत’ पुन्हा टीम इंडियासमोर उभे राहत आहे का?

अहमदाबाद येथील २०२३ च्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमधील दारुण पराभवचे ‘भूत’ पुन्हा टीम इंडियासमोर उभे राहत आहे का? हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

टी-२० प्रकारात नंबर १ असलेल्या भारताचा रेकॉर्ड ७-३ असा शानदार असला तरी रविवारी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडिया कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.

१९ नोव्हेंबर २०२३ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना गमावल्याची आठवण अजूनही चाहत्यांना सतावत आहे. पण खेळाडूंनाही त्या पराभवाचा असर अजूनही आहे का? त्या दु:खी रात्रीची आठवण करून देणारी कोणतीही गोष्ट दूर ठेवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे.

अहमदाबाद येथील जुन्या कटू आठवणी लक्षात घेऊन टीम इंडियाने हॉटेल आणि ट्रेनिंग रूम बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. २०२३ ला भारतीय संघ आयटीसी नर्मदा येथे वास्तव्यास होता.

आता आयसीसी वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यादरम्यान तिथे राहण्यास संघ व्यवस्थापनाने नकार दिला आहे.

मुंबईतील सेमीफायनलआधी टीम इंडियाने चंद्रग्रहणाच्या वेळी सराव टाळला होता. अहमदाबादमध्ये भारतीय संघ पाहुण्या संघाची ड्रेसिंग रूम वापरणार असल्याचेही सांगितले जात आहे.

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विमल कुमार म्हणाले की, अनेकांना वाटते की अहमदाबादचे मैदान भारतासाठी अपशकुनी आहे. चंद्रग्रहणाच्या वेळ सराव टाळून भारताला यश मिळाले. भारतीय खेळाडू आध्यात्मिक गोष्टींकडेही लक्ष देताना दिसते.

भारतीय संघात अजून एक बदल आहे; पण मी आता सांगू शकत नाही. गरज भासल्यास विश्वचषक जिंकल्यावर कदाचित मी ते उघड करेन, असेही विमल कुमार यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे फर्स्ट पोस्टच्या वृत्तानुसार, भारतीय संघाने हॉटेल आणि ड्रेसिंग रुम यात बदल झाल्याची गोष्ट खरी असल्याचे म्हटले आहे. पण त्याचं कारण वेगळे असल्याचा उल्लेख केला आहे.

आयसीसीने पहिल्या फायनलिस्टसाठी आधीच नर्मदा हॉटेल निश्चित केले होते. न्यूझीलंडचा संघ फायनलमध्ये पोहचणारा पहिला संघ ठरला. त्यामुळे त्यांचा मुक्काम या हॉटेलात आहे, असा उल्लेख फर्स्ट पोस्टच्या वृत्तामध्ये करण्यात आला आहेय

अहमदाबादमधील साडेसाती टाळून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इतिहास रचणार का? अशी चर्चा भारत-न्यूझीलंजड यांच्यातील फायनलआधी रंगताना दिसत आहे.