Join us
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंडच्या नवख्या संघाने टीम इंडियाला असं पाजलं पराभवाचं पाणी, भारतीय संघाला ‘ती’ एक चूक नडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 12:47 IST

Open in App
1 / 5

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने यजमान भारतीय संघाला २-१ अशा फरकाने मात दिली. पहिला सामना जिंकल्यानंतर पुढच्या दोन्ही सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. रविवारी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या ३३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या झुंजार खेळीनंतरही भारतीय संघाला ४१ धावांनी पराभव पत्करावा लागला.

2 / 5

या मालिकेत मायकेल ब्रेसवेलच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला न्यूझीलंडचा संघ बऱ्यापैकी नवखा आणि अननुभवी होता. या मालिकेत न्यूझीलंडचा संघ नियमित कर्णधार मिचेल सेंटनर, वेगवान गोलंदाज मॅट हेनरी, अष्टपैलू रचिन रवींद्र, वेगवान गोलंदाज जेकब डफी हे संघात नव्हते. तर न्यूझीलंडच्या तुलनेत भारतीय संघ बऱ्यापैकी मजबूत होता.

3 / 5

कमी अनुभवी असूनही न्यूझीलंडचा संघ भारतीय संघावर वरचढ ठरला. पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या खेळीने भारतीय संघाला तारले होते. मात्र नंतरच्या दोन सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी अपेक्षेनुरूप झाली नाही. तसेच गोलंदाजीमध्येही धार दिसून आली नाही, हीच बाब भारतीय संघाला नडली. उलट न्यूझीलंडची सांघिक कामगिरी उत्तम झाली. त्यामुळे न्यूझीलंडला पहिल्यांदाच भारतीय भूमीवर एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम करता आला.

4 / 5

न्यूझीलंडकडून डेरेल मिचेलने जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याच्या फटकेबाजीला वेसण घालण्यात भारतीय गोलंदाज अखेरपर्यंत अपयशी ठरले. डेरेल मिचेलने या मालिकेते १७६ च्या सरासरीने ३५२ धावा कुटून काढल्या. मिचेलने दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात मिळून सलग दोन शतके फटकावली.

5 / 5

दुसरीकडे भारतीय संघासाठी विराट कोहलीने केलेली सातत्यपूर्ण फलंदाजी आणि अष्टपैलू हर्षित राणाची आश्वासक कामगिरी या दोन बाबी भारतीय संघासाठी सकारात्मक ठरल्या. विराटने ३ सामन्यांत ८० च्या सरासरीने २४० धावा काढल्या. तर हर्षित राणा याने ६ बळी टिपतानाच ८३ धावा काढत अष्टपैलू दर्जा दाखवला.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघविराट कोहली