भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्याची सुरुवात विचित्र झाली. पहिल्या कसोटी पाच शतके ठोकूनही टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला.
कर्णधार शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी शतके ठोकली, पण भारतीय गोलंदाजांनी साऱ्यांनाच निराश केले.
शेवटच्या डावात इंग्लंडला ३००हून जास्त धावांचे आव्हान देण्यात आले होते. पण भारतीय गोलंदाजांना केवळ ५ बळी घेता आले.
'पदार्पणवीर' साई सुदर्शनने दोन्ही डावात मिळून केवळ ३० धावा केल्या. त्यामुळे त्याच्या जागी अष्टपैलू स्पिनर वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते.
अनुभवी शार्दुल ठाकूरनेही निराश केले. त्याने एकूण ५ धावा आणि २ बळी घेतले. त्याच्या जागी अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीला स्थान मिळू शकते.
जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर साशंकता आहे. तो न खेळल्यास त्याच्या जागी आकाश दीपला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
चौथा बदल बॅटिंग ऑर्डरचा असेल. साई सुदर्शनच्या जागी करुण नायर तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. तर वॉशिंग्टन सुंदर सातव्या क्रमांकावर खेळेल.