Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs ENG : टीम इंडिया 'लगान' वसूल करायला सज्ज; इंग्लंडच्या 'या' ७ खेळाडूंना घालावाच लागेल 'लगाम'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 07:35 IST

Open in App
1 / 10

भारत-इंग्लंड यांच्यात सलग तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची सेमीफायनल रंगल्याचे पाहायला मिळणार आहे.

2 / 10

मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात टीम इंडिया 'लगान' वसूल करायचा असेल तर इंग्लंडच्या ताफ्यातील पाच खेळाडूंना 'लगाम' हा घालणे गरजेचे आहेत.

3 / 10

इंग्लंडचा संघ यंदाच्या स्पर्धेत दमदार कामगिरी करताना दिसत आहे. इथं एक नजर टाकुयात इंग्लंडच्या ताफ्यातील अशा पाच खेळाडूंवर जे टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकतात.

4 / 10

इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याने यंदाच्या हंगामात एका शतकासह इंग्लंडकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याला रोखण्याचे मोठे चॅलेंज भारतीय संघासमोर असेल.

5 / 10

जोफ्रा आर्चर हा इंग्लंडच्या गोलंदाजीचा कणा आहे. यंदाच्या हंगामात ७ सामन्यात आर्चरनं १० विकेट्स घेतल्या आहेत. नव्या चेंडूवर स्विंगसह तो भारतीय फलंदाजांसमोर चॅलेंज निर्माण करू शकतो. एवढेच नाहीतर डेथ ओव्हरमध्येही तो टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकतो.

6 / 10

विल जॅक्स याने यंदाच्या हंगामात बॅटिंग बॉलिंगमध्ये खास कामगिरी करून दाखवली आहे. भारतीय फलंदाज फिरकीसमोर अडखळल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे टीम इंडियातील फलंदाजांना विल जॅक्सच्या गोलंदाजीवरही सांभाळून खेळावे लागेल.

7 / 10

आदिल रशीद हा इंग्लंडच्या फिरकीचे प्रमुख अस्त्र आहे. याआधी भारताविरुद्धच्या दोन्ही सेमीफायलमध्ये त्याने उत्तम गोलंदाजी केली आहे. यंदाच्या हंगामात त्याच्या खात्यात ११ विकेट्स आहेत. त्यामुळे हा गोलंदाजही टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकतो.

8 / 10

सलामीवीर फिल सॉल्ट हा संघाला आक्रमक सुरुवात करून देण्यासाठी ओळखला जातो. पॉवर प्लेमध्ये त्याच्या खेळीला ब्रेक लावण्याचे चॅलेंज भारतीय गोलंदाजांसमोर असेल.

9 / 10

सॅम कुरेन हा इंग्लंडसाठी ट्रम्प कार्ड आहे. फलंदाजीसह गोलंदाजीच्या जोरावर तो एकहाती सामन्याला कलाटणी देण्यात माहिर आहे. यंदाच्या हंगामात संघ संकटात असताना त्याने आपल्यातील धमक दाखवूनही दिली आहे. त्यामुळे त्याच्यापासूनही टीम इंडियाला सावध राहावे लागेल.

10 / 10

जॉस बटलर हा इंग्लंडच्या ताफ्यातील प्रमुख फलंदाज आहे. आतापर्यंतच्या स्पर्धेत तो धावांसाठी संघर्ष करताना दिसला आहे. महत्त्वाच्या सामन्यात त्याची बॅट तळपली तर तोही धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे त्याचा फ्लॉप शो कायम राहिल यावरही टीम इंडियाच्या गोलंदाजांना फोकस करावा लागेल.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघजोस बटलर