Join us

Rohit Sharma, IND vs AUS: "म्हणूनच रोहित शर्माला कसोटीत शतक ठोकता आलं.."; बॅटिंग कोचचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 09:50 IST

Open in App
1 / 6

Rohit Sharma century, IND vs AUS 1st Test: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने नागपुरात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी धडाकेबाज शतक झळकावले. भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर यांनी कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले की त्याने ऑस्ट्रेलियाच्या जबरदस्त आक्रमणाविरुद्ध फिरकीला पोषक खेळपट्टीवरही शानदार शतक झळकावले आणि संघाला मजबूत स्थितीत नेले.

2 / 6

रोहितने नॅथन लियॉन आणि पॅट कमिन्स सारख्या गोलंदाजांच्या चमकदार आक्रमणासमोर खेळपट्टीवर ३४५ मिनिटे संथ फलंदाजी केली आणि शानदार १२० धावा केल्या. रोहितचे शतक, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यात आठव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी भारताला आघाडीवर नेण्यास मदत झाली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ७ बाद ३२१ पर्यंत पोहोचले आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात १४४ धावांची आघाडी घेतली.

3 / 6

रोहितचे शतक त्याच्या आधीच्या काही शतकांपेक्षा खूपच वेगळे ठरले. त्याने याआधी सप्टेंबर २०२१ मध्ये ओव्हलवर वेगवान खेळपट्टीवर शतक ठोकले होते पण यावेळी त्याने संयमी शतक ठोकले. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर म्हणाले की, रोहितचा संयम आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि फलंदाजीची शैली बदलल्यामुळेच त्याला नागपुरात यश मिळू शकले.

4 / 6

रोहितने ६६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने शतक झळकावण्यासाठी १०५ चेंडूंचा सामना केला. एक फलंदाज म्हणून त्याच्यात हीच गुणवत्ता आहे, असे मला वाटते. तो परिस्थितीनुसार आपला खेळ बदलू शकतो. तो भारतात कशी कामगिरी करतो आणि आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने कशा धावा केल्या हे तुम्हाला माहिती आहेच.

5 / 6

कोच विक्रम राठोड म्हणाले, 'आम्ही इंग्लंडला गेलो. ती पूर्णपणे वेगळी खेळपट्टी होती ज्यावर तुम्हाला खेळायचे होते. आणि आज ही विकेट सोपी नव्हती. धावा काढण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागली. सामान्यत: सुरुवातीच्या धावा केल्यानंतर तो वेगाने खेळतो पण आज तसे झाले नाही.'

6 / 6

'चांगली सुरूवात मिळाली की तो सहसा थांबत नाही. त्याला हवेत फटके खेळायला आवडते. दिवसाच्या शेवटच्या सत्रात ९५ धावा करून भारताने ऑस्ट्रेलियाला दडपणाखाली ठेवले आहे. यात रोहितने चांगली कामगिरी पण तरीही मला असे वाटते की सामन्याचा शेवटचा चेंडू टाकल्यानंतर तो सामना संपला असे आपण म्हणू शकतो. आताच काही बोलू शकत नाही,' असे ते म्हणाले.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ
Open in App