श्रीलंकेत नुकत्याच पार पडलेल्या तिरंगी वनडे मालिकेत स्मृती मानधना हिने फायनलमध्ये शतकी खेळी केली होती.
या विक्रमी शतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने फायनल मारली. याशिवाय हे शतक स्मृती मानधनाच्याही फायद्याचे ठरले आहे. आयसीसीच्या महिला वनडे रँकिंगमध्ये ती आता दुसऱ्या स्थानावर पोहचलीये.
तिरंगी वनडे मालिकेतील फायनलमध्ये स्मृती मानधना हिने १०१ चेंडूत ११६ धावांची खेळी केली होती. या कामगिरीसह आयसीसी रँकिंगमध्ये ती ७२७ रेटिंग पॉइंट्स मिळवत दुसऱ्या स्थानी विराजमान झालीये.
स्मृती मानधना ही नंबर वनच्या अगदी जवळ असून ती लवकरच हा डाव साध्य करेल, असे दिसते.
महिला क्रिकेटमधील वनडेत नंबर वन असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड आणि स्मृती मानधना या दोघींमध्ये फक्त ११ गुणांचे अंतर आहे.
आयसीसीच्या महिला वनडे रँकिंगमध्ये जेमिमा रॉड्रिग्जलाही फायदा झाला आहे. ती पाच स्थानांच्या सुधारनेसह १५ स्थानावर पोहचली आहे.
भारताची फिरकीपटू स्नेह राणा हिने देखील रँकिंगमध्ये चार स्थानांच्या सुधारणेसह ३४ व्या स्थानावर झेप घेतलीये.
ऑलराउंडर खेळाडूंच्या यादीत दीप्ती शर्मा टॉप ५ मध्ये पोहचली आहे.