Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup 2026 स्पर्धेतील ५ वादग्रस्त घटना; IND vs NZ यांच्यातील फायनलमध्येही दिसली 'टशन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 19:44 IST

Open in App
1 / 9

७ फेब्रुवारी ते ८ मार्च, २०२६ या कालावधीत पार पडलेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या हंगामात २० संघ आणि ५५ सामन्यानंतर भारतीय संघ जगजेत्ता ठरला.

2 / 9

यंदाच्या हंगामात स्पर्धेला सुरुवात होण्यापासून ते अगदी भारत-न्यूझीलंड यांच्यातील फायनलमध्ये मैदानात काही वादग्रस्त घटना घडल्याचे पाहायला मिळाले. इथं जाणून घेऊयात टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत गाजलेल्या वादग्रस्त घटना

3 / 9

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा अगदी तोंडावर असताना बांगलादेशच्या संघाने सुरक्षिततेच्या कारणास्तव भारतीय मैदानात सामने खेळण्यास नकार दिला. BCCI नं मुस्तफिझुर रहमानला IPL मध्ये बंदी केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. बांगलादेशनं आपले टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने श्रीलंकेत स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. हा मुद्दा चांगलाच गाजला.

4 / 9

आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं बांगलादेश सरकार आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाची मागणी फेटाळत खेळा, नाहीतर बाहेर पडा अशी भूमिका घेतली. शेवटी बांगलादेशचा संघ स्पर्धेबाहेर पडला. त्यांच्या जागी आयसीसीने स्कॉटलंडच्या संघाला संधी दिल्याचे पाहायला मिळाले. ही यंदाच्या टी -२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात वादग्रस्त घटना ठरली.

5 / 9

6 / 9

शेवटी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पाक सरकारने यूटर्न घेतला अन् पाकिस्तान-भारत यांच्यातील सामना नियोजित वेळेनुसार झाला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा एकतर्फी धुव्वा उडवला.

7 / 9

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं सुपर-८ फेरीत कोणता संघ कुणाविरुद्ध खेळणार ते आधीच ठरवलं होते. साखळी फेरीत अव्वलस्थानावर असणारे संघ सुपर ८ मध्ये एकाच गटात आले. या प्रणालीवरून सूर्यकुमार यादवनंही नाराजी व्यक्त केली होती.

8 / 9

अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या संघर्षामुळे वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आल्यावर परदेशी खेळाडूंना मायदेशी परतण्याची समस्या निर्माण झाली. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ICC वर थेट आरोप करत इंग्लंडला घरी पाठवण्याला प्राधान्य दिल्याचा मुद्दाही वादग्रस्त ठरला.

9 / 9

यंदाच्या हंगामात सामन्यादरम्यान दोन संघातील खेळाडूंमध्ये फारसा वाद दिसला नाही. पण फायनलमध्ये अर्शदीप सिंग विरुद्ध डॅरेल मिचेल यांच्यात शाब्दिक चकमक रंगल्याचे पाहायला मिळाले. अर्शदीपनं चेंडू अंगावर फेकून मारल्यावर न्यूझीलंडचा स्टार चांगलाच भडकला. भारतीय कर्णधार सूर्यानं दोघांच्यातील वाद मिटवल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध न्यूझीलंडभारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघअर्शदीप सिंगपाकिस्तानबांगलादेशआयसीसी