स्वत:च्या आचाऱ्याला सोबत घेऊन वर्ल्डकप खेळतोय हा अष्टपैलू खेळाडू, नाव ऐकून व्हाल अवाक्

ICC CWC 2023: यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतून अनेक मजेशीर बातम्याही समोर येत आहेत. या स्पर्धेत एका खेळाडू त्याच्या वैयक्तिक आचाऱ्यासह सहभागी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतून अनेक मजेशीर बातम्याही समोर येत आहेत. एकीकडे स्पर्धेतील ३२ सामने आटोपले असून, यजमान भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांनी प्रत्येकी १२ गुणांसह उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केलंलं आहे. दरम्यान या स्पर्धेत एका खेळाडू त्याच्या वैयक्तिक आचाऱ्यासह सहभागी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस या वर्ल्डकपमध्ये त्याच्या वैयक्तिक आचाऱ्याला सोबत घेऊन खेळत आहे. त्याचं कारण वाचूनही तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

याबाबत मार्कस स्टोयनिस याने स्वत: सांगितले की, मी ‘लो कार्ब डाएट’ असलेला आहार घेतो. त्यामुळे मला पर्सनल शेफ सोबत ठेवण्याची आवश्यकता भासते. भारताचेही अनेक खेळाडू असं करतात. त्यामुळे मलाही तिथूनच ही कल्पना सूचली. मी माझ्या आहाराबाबत जागरुक असतो.

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हासुद्धा त्याच्यासोबत पर्सनल शेफ सोबत बाळगतो. हार्दिक पांड्या सध्या भारतीय संघाबाहेर आहे.

स्टोयनिसने या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत केवळ ३ सामने खेळले आहेत. श्रीलंकेविरुद्ध त्याने २० तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात २१ धावा काढल्या होत्या. त्याबरोबरच त्याने दोन बळीही टिपले होते. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या सामन्यावेळी त्याला काही त्रास होत असल्यासारखे दिसत होते.