इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून वन डे क्रिकेट वर्ल्ड स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या दहा संघांनी आपापले तगडे संघ मैदानात उतरवले आहेत. पण, असे बरेच दुर्दैवी खेळाडू आहेत की त्यांची वर्ल्ड कपची बस थोडक्यात हुकली आहे. आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दुर्दैवी ठरलेल्या 11 खेळाडूंचा एक संघ तयार केला आहे. कोण आहेत ते अकरा अनलकी खेळाडू....
श्रीलंकेचा फलंदाज निरोशान डिकवेला
ऑस्ट्रेलियाचा पीटर हँड्सकोम्ब
श्रीलंकेचा दिनेश चंडिमल
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज किरॉन पोलार्ड
पाकिस्तानचा यष्टिरक्षक व फलंदाज मोहम्मद रिझवान
पाकिस्तानचा क्रिकेटर आसीफ अली
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू जोफ्रा आर्चर
श्रीलंकेचा फिरकीपटू अकिला धनंजया
पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीर
भारतीय संघातील मधल्या फळीचा फलंदाज अंबाती रायुडु
भारताचा युवा यष्टिरक्षक रिषभ पंत