Join us

'किंग कोहली'ला आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत हे पाच विक्रम करण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 18:18 IST

Open in App
1 / 6

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्याआधी विराटला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले. त्यामुळे विराट विरूद्ध बीसीसीआय असा सामना काही दिवस मैदानाबाहेर पाहायला मिळाला. पण आता आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत विराट कोहलीकडे अनेक मोठे-मोठे विक्रम मोडण्याची आणि नवा इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.

2 / 6

रिकी पॉन्टींगचा विश्वविक्रम मोडण्याची संधी- विराटने शेवटच्या आफ्रिका दौऱ्यात शतक ठोकल्यानंतर अंगठीला किस करत शतक साजरं केलं होतं. या मालिकेत विराटने आणखी एक शतक ठोकल्यास कर्णधार म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं ठोकण्याचा विश्वविक्रम विराटच्या नावे होऊ शकतो. सध्या विराट आणि रिकी पॉन्टींग ४१ शतकांसह बरोबरीत आहे.

3 / 6

द्रविडला मागे टाकणार? - राहुल द्रविडने आफ्रिकेविरूद्ध २१ कसोटी सामन्यात १,२५२ धावा केल्या आहेत. कोहलीने या मालिकेत १७७ धावा केल्यास तो द्रविडला मागे टाकेल. असे झाल्यास कोहली आफ्रिकेविरूद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांच्या यादीत तिसरे स्थान पटकावेल.

4 / 6

८ हजार धावांचा टप्पा - विराट कोहलीच्या सध्या कसोटी क्रिकेटमध्ये ७,८०१ धावा आहेत. तीन सामन्यांच्या मालिकेत २०० धावा पूर्ण करून ८ हजार कसोटी धावा गाठण्यास विराट कोहली सज्ज आहे. यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे.

5 / 6

१०० वी कसोटी - विराट कोहलीने आतापर्यंत ९७ कसोटी खेळल्या आहेत. मालिकेतील शेवटची कसोटी ही त्याची १००वी कसोटी असणार आहे. या कामगिरीसोबतच विराट कोहलीला सचिन तेंडुलकर आणि इतर बड्या खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळेल. १००वी कसोटी खेळणारा १२ वा भारतीय खेळाडू असेल.

6 / 6

नवा इतिहास रचण्याची संधी - भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या भूमिवर एकदाही कसोटी मालिका जिंकलेला नाही. भारतीय संघाने गेल्या तीन-चार वर्षात कसोटी मालिकांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आफ्रिकेत मालिका विजयाचा इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
Open in App