Join us
Daily Top 2Weekly Top 5

"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 17:20 IST

Open in App
1 / 7

टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी२० मालिका खेळत आहे. यातील ३ सामने खेळून झाले असून, त्यात भारतीय संघ २-१ने आघाडीवर आहे.

2 / 7

या टी२० मालिकेत आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये फलंदाजांनी वर्चस्व गाजवल्याचे चित्र आहे. दोन्ही संघांच्या फलंदाजांनी दमदार खेळ केला आहे.

3 / 7

असे असूनही उपकर्णधार शुबमन गिलला अद्याप सूर गवसलेला नाही. त्याने आतापर्यंत तीन सामन्यात अनुक्रमे २, ० आणि २८ धावा केल्या आहेत.

4 / 7

शुबमन गिलच्या सततच्या खराब कामगिरीमुळे चाहत्यांसोबतच भारताचा अनुभवी फलंदाजही शुबमन गिल आणि व्यवस्थापनावर संतापल्याचे दिसले.

5 / 7

मोहम्मद कैफ म्हणाला, 'तुम्हाला शुबमन गिलला संघाबाहेर बसवावेच लागेल. त्याला संघातून वगळले असे सांगण्याऐवजी त्याला विश्रांती दिली असे सांगा.'

6 / 7

7 / 7

'गिलला खराब खेळूनही वर्षभर संधी मिळतेय आणि मला २-३ खराब खेळीनंतर बाहेर बसवलं असा विचार संजू सॅमसन करत असेल ,' असेही कैफ म्हणाला.

टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशुभमन गिलसंजू सॅमसन