हार्दिक पांड्या गेल्या वर्षभरापासून चांगल्या-वाईट कारणांमुळे चर्चेत आहे. IPL 2024 आधी रोहितच्या जागी मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्याने हार्दिकवर टीका झाली.
पराकोटीची टीका सहन केल्यानंतर हार्दिक पांड्या T20 World Cup 2024 मध्ये 'हिरो' बनला. त्याच्या संयमी गोलंदाजीने भारताला विश्वचषक मिळवून दिला.
टी२०चा विजयोत्सव साजरा केल्यानंतर लगेचच हार्दिकच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आले. पत्नी नताशा स्टँकोविचशी घटस्फोट घेत दोघे वेगळे झाले.
घटस्फोटाचे दु:ख पचवत असतानाच हार्दिकने टीम इंडियाचे टी२० कर्णधारपद गमावले. त्यानंतर हार्दिकचे नाव मॉडेल-सिंगर जास्मिन वालियाशी जोडले गेले.
आता बांगलादेशविरूद्ध टी२० मालिका सुरु असताना हार्दिक पांड्याचे एका तरुणीसोबतचे फोटो चर्चेत आहेत. कोण आहे ती?
या तरुणीचे नाव कोमल शर्मा असून ती सलामीवीर अभिषेक शर्माची बहिण आहे. ती अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस असून इन्स्टा बायोनुसार डॉक्टर असल्याचे समजते.
कोमल ही अभिषेकची लहान बहीण आहे. त्याला एक मोठी बहीण देखील आहे. तिचे नाव सानिया आहे. पण ती क्रिकेट पाहायला आल्याचे दिसत नाही.
फोटो सौजन्य- डॉ. कोमल शर्मा इन्स्टाग्राम