दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून हार्दिक पांड्याने अगदी धमाक्यात पदार्पण केले आहे. फलंदाजीसह गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी करून दाखवत त्याने सामनावीर पुरस्कार पटकवला.
दीड महिन्यानंतर यशस्वी पुनरागमनाचं मोठं श्रेय त्याने आपल्या गर्लफ्रेंड माहिका शर्मा हिला दिल्याचे पाहायला मिळाले.
बीसीसीआयने हार्दिक पांड्याचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो म्हणतो की, दुखापत मानसिकृष्ट्या कसोटीच असते. या परिस्थितीत मनात अनेक प्रश्न निर्माण होतात.
माझ्या यशस्वी पुनरागमनात माझ्या जवळच्या लोकांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यात विशेषत: माझ्या पार्टनरचा. ती आयुष्यात आल्यापासून माझ्याबाबतीत अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, असे सांगत हार्दिक पांड्याने माहिका शर्मावरील प्रेम खुल्लमखुल्ला व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
हार्दिक पांड्यानं प्रेमाची बरसात केल्यावर माहिका शर्माची रिअॅक्शनही चर्चेत आली आहे. बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडिओवर इमोजीसह तिने खास कमेंट करून तिने पांड्यासंदर्भातील मनातील गोष्ट बोलून दाखवली आहे.
'तुझ्यासारखं कोणी नाही राजा…' या कमेंटसह माहिकाने शर्मानं क्रिकेटरसोबतचं खास बाँडिंग दाखवून दिले आहे. मॅचनंतर दोघांच्यात रंगलेला प्रेमाचा खेळ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याआधी हार्दिक पांड्यानं गर्लफ्रेंडचे चुकीच्या पद्धतीने फोटो क्लिक करणाऱ्या पापाराझींवर राग काढल्याचे पाहायला मिळाले होते.
हार्दिक पांड्याने ३२ वा बर्थडे माहिकासोबत शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. सातत्याने तो तिच्यासोबतचे खास क्षण शेअर करताना दिसत आहे. आता सामन्यानंतर त्याने माहिकाला श्रेय दित आपल्या आयुष्यातील तिचं स्थान किती महत्त्वपूर्ण आहे, तेच सांगून टाकले आहे.