Join us  

Happy Birthday Sachin Tendulkar: सचिनच्या नावावर आहेत 'हे' 5 अद्भुत विक्रम; विराट तर सोडाच, इतरही कोणता खेळाडू आसपास नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 9:15 AM

Open in App
1 / 6

Happy Birthday Sachin Tendulkar, 5 Records still unbeaten: टीम इंडियाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देव मानला जाते. आज या क्रिकेटच्या देवाचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया त्याने केलेले असे 5 विक्रम, जे आजपर्यंत कुणालाही तोडणे शक्य झालेले नाही.

2 / 6

सचिनचा शंभर शतकांचा रेकॉर्ड अजून पर्यंत कोणालाही तोडता आलेला नाही. सचिनने 664 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शंभर शतके ठोकली. सचिन नंतर सध्या विराट कोहली 80 शतकांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्याला सचिनचा विक्रम मोडण्यासाठी आणखी 21 शतके करावी लागणार आहेत. सचिनने आपल्या कारकिर्दीत 51 कसोटी आणि 49 वनडे शतके ठोकली.

3 / 6

सचिन तेंडुलकरने टेस्ट क्रिकेटमध्ये 15,921 धावा बनवल्या. इतर कोणताही खेळाडू अजूनही 14,000 कसोटी धावांच्या आसपासही पोहोचलेला नाही. सचिनने आपल्या 15,921 धावा 53.78 च्या सरासरीने बनवल्या होत्या. हा क्रिकेट जगतातील एक अद्भुत असा विक्रम आहे.

4 / 6

सचिनने 16व्या वर्षापासून टेस्ट क्रिकेट खेळायला सुरूवात केली. 40व्या वर्षापर्यंत सचिन टेस्ट क्रिकेट खेळत राहिला. त्यामुळे त्याने आपल्या प्रदीर्घ अशा कारकिर्दीत एकूण 200 टेस्ट मॅचेस खेळल्या. त्याचा हा विक्रम इतर कोणीही खेळाडू तोडू शकेल असे सध्या तरी वाटत नाही.

5 / 6

सर्वाधिक वनडे मॅच खेळण्याचे रेकॉर्ड सचिनच्या नावावर नोंदवण्यात आले आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीत 463 वनडे सामने खेळले. सचिनच्या नंतर या यादीत श्रीलंकेचा महेला जयवर्धने हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 448 वनडे सामने खेळल्यानंतर निवृत्तीचा निर्णय घेतला.

6 / 6

टेस्ट क्रिकेट प्रमाणेच वन डे क्रिकेटमध्ये देखील सचिन तेंडुलकरच्याच नावावर सर्वाधिक धावा आहेत. सचिनने त्याच्या कारकिर्दीत 44.83 च्या सरासरीने 18,426 धावा केल्या. वनडे क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक लगावण्याचा मान सचिन तेंडुलकरलाच मिळाला होता.

टॅग्स :सचिन तेंडुलकरभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीभारतभारतीय क्रिकेट संघ