Join us

Glenn Maxwell marry Vini Raman : तिला विचारलं गेलं, Glenn Maxwell 'गोरा' आहे म्हणून लग्न करतेस ना?; Vini Raman ने दिलेलं जबरदस्त उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 19:15 IST

Open in App
1 / 8

ग्लेन मॅक्सवेल व विनी रमण हे २७ मार्चला लग्न करणार असल्याचे वृत्त आधी प्रसिद्ध झाले होते आणि भारतीय पद्धतीने पुन्हा हे लग्न होणार असल्याची चर्चा आहे.

2 / 8

दरम्यान, १८ मार्चला ही दोघं विवाहबंधनात अडकले. ग्लेन मॅक्सवेल व विनी रमण या दोघांनी सोशल मीडियावरून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.

3 / 8

२०१३ मध्ये मेलबर्न स्टार इव्हेंटमध्ये ग्लेन व विनी यांची पहिली भेट झाली. बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०२०मध्ये भारतीय पद्धतीनेच दोघांनी साखरपुडा केला.

4 / 8

अँचोरमॅन 2@ क्राऊन येथे त्यांची पहिली डेट झाली. ग्लेन मॅक्सवेलनं विनीला पहिलं I Love you म्हटले...

5 / 8

भारतीय वंशाची विनी ऑस्ट्रेलियन नागरिक आहे आणि ती मेलबर्न येथे फार्मासिस्टची प्रॅक्टीस करते..

6 / 8

विनी ऑस्ट्रेलियातील तामिळ कुटुंबातील आहे. व्हिक्टोरिया येथील Mentone Girls Secondary College मध्ये तिने वैद्यकिय शिक्षण पूर्ण केले.

7 / 8

20 सप्टेंबरला ग्लेन आणि विनी यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला होता. त्यावरून एका भारतीय व्यक्तीनं विनीला ट्रोल केले होते. त्यानंतर विनीनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देण्याचे ठरवले. आपण कोणासोबत आयुष्य घालवायचं हा सर्वस्वी माझा निर्णय आहे आणि त्यात रंग आणि राष्ट्रीयत्व हा मुद्दा येत नाही.

8 / 8

तिनं लिहीलं होतं की,''मी अशा कमेंट्सना प्रत्युत्तर देत नाही. ट्रोलर्सना केवळ स्वतःकडे लक्ष वेधायचे असते, परंतु 6 महिन्यांच्या या लॉकडाऊनमध्ये माझ्याकडे बराच फावला वेळ आहे. त्यामुळे ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्यांना धडा शिकवण्याचा ही संधी आहे. वेगळ्या रंगरुपाच्या व्यक्तीवर प्रेम केल्याने तुम्ही विकले गेलात, असं होत नाही. गोऱ्या व्यक्तिशी प्रेम केलं, म्हणून मला भारतीय असल्याची लाज वाटते, असा अर्थ होत नाही. गोऱ्या व्यक्तिवर प्रेम करणं हा माझा निर्णय आहे आणि त्यामुळे लोकं काय विचार करतात, याची मला चिंता नाही.''

टॅग्स :ग्लेन मॅक्सवेलआॅस्ट्रेलियासोशल मीडिया
Open in App