Join us

गौतम गंभीरने पत्नी नताशाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, खास फोटोसह लिहिला रोमँटिक मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 16:46 IST

Open in App
1 / 6

टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. त्याची पत्नी नताशा हिचा आज (२६ जुलै) वाढदिवस आहे. गंभीरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

2 / 6

गंभीर आणि नताशा एकमेकांना लग्नाच्या आधीपासूनच ओळखत होते. नताशा ही गंभीरच्या वडिलांच्या मित्राची मुलगी आहे. त्यांची पहिली भेट २००७मध्ये एका पार्टीदरम्यान झाली.

3 / 6

गौतम आणि नताशा यांच्यातील मैत्री वाढल्यानंतर दोघांच्याही घरच्यांनी लग्नाची चर्चा सुरू केली. त्यानंतर गंभीरने लग्नापूर्वी नताशासमोर एक अट ठेवली होती. २०११च्या वर्ल्डकपनंतरच तो लग्न करणार असल्याची ती अट होती.

4 / 6

गौतम गंभीरने तसेच केले आणि २०११चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याने नताशाशी लग्न केले. गंभीरने फायनलमध्ये मॅचविनिंग इनिंग खेळली, जी भारतीय चाहत्यांना कायम लक्षात राहिली.

5 / 6

गौतम गंभीरने ऑक्टोबर २०११ मध्ये नताशासोबत लग्न केले. लग्नापूर्वी त्याने पत्नीसमोर एक अट ठेवली होती. गंभीरच्या काही जवळच्या लोकांना वगळता या अटीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे २०११मध्ये त्यांनी लग्न केले.

6 / 6

सध्या टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असलेला गौतम गंभीर आणि नताशा हे दोन मुलांचे पालक आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव आजीन आणि लहान मुलीचे नाव अनैजा आहे.

टॅग्स :गौतम गंभीरपती- जोडीदारलग्नवन डे वर्ल्ड कप