टीम इंडियाचे विद्यमान प्रशिक्षक गौतम गंभीर आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी या जोडीनं टीम इंडियाला एकदा नव्हे तर दोनदा वर्ल्ड चॅम्पियन केलंय.
पण वर्ल्ड कप विजयानंतर दोन्ही वेळी सर्वाधिक चर्चेत राहिला तो MS धोनी. या मुद्यावर गौतम गंभीरनं फक्त धोनीमुळे वर्ल्ड कप जिंकलेला नाही, असे म्हणत अनेकदा माजी कर्णधारावर निशाणा साधल्याचेही पाहायला मिळाले आहे.
आता या दोघांची खास फ्रेम चर्चेत आलीये. एका लग्न समारंभातील दोघांचा लूक अन् धोनीनं गंभीरकडे पाहून दिलेली रिअॅक्शन सर्वांचे लक्षवेधून घेत आहे.
गुजरात राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांच्या भावाच्या लग्नाच्या कार्यक्रमात महेंद्रसिंह धोनीनं पत्नी साक्षीसोबत हजेरी लावली होती. या दोघांच्या लव्हली फोटोपेक्षाही त्याचा गंभीरसोबतचा फोटो लक्षवेधी ठरल्याचे पाहायला मिळत आहे.
शाही लग्न सोहळ्यात भारतीय कसोटी आणि टी-२० संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माही संघवी कुटुंबियांसोबत स्पॉट झाला. हा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंग पत्नी गीता बसरा हिच्यासोबत या कार्यक्रमात सहभागी झाला होता.
house.of.events या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये MS धोनीचा सुटाबुटातील कडक लूक पाहायला मिळतो.
या कार्यक्रमात हरबजन सिंगसह पार्थिव पटेल आणि तिलक वर्मा या क्रिकेटर्सची झलकही पाहायला मिळाली.
इरफान पठाण आपल्या कुटुंबियासह या कार्यक्रमात पोहचला होता.