Ravi Shastri makes BIG statement : भारतात जळकुटे लोकं आहेत, तुम्ही अपयशी व्हाल याचीच ते वाट पाहतात; रवी शास्त्री यांचे मोठे विधान

Ravi Shastri makes BIG statement : भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी जेव्हा स्वीकारली तेव्हा मला हे माहीत होते की, मला जाड कातडी, ड्युक बॉलपेक्षा अधिक जाड कातडी घालावी लागेल. कारण, जळकुट्या लोकांचा सामना करायचा होता आणि अशी एक गँग होती की ते माझ्या अपयशाचीच वाट पाहत होते, असे विधान माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केली.

ट्वेंट-२० वर्ल्ड कप २०२१नंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याचा निर्णय शास्त्रींनी घेतला. त्यांनी २०१४ ते २०१६ या कालाधवीत संघाचे संचालक म्हणून, तर २०१७ ते २०२१ या कालावधीत मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. सात वर्षांच्या या कार्यकाळाबद्दल सांगताना शास्त्रींनी विराट कोहलीसोबतच्या घट्ट नात्याबद्दलही मत व्यक्त केले.

The Guardian ला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले, लेव्हल वन?, लेव्हल टू? असा कोणताच कोचिंग बॅज माझ्याकडे नव्हता.. भारता सारख्या देशात जळकुटी लोकं नेहमीच असतात आणि लोकांचा गट तुम्ही अपयशी ठरावं, हीच इच्छा बाळगतात. त्यामुळेच मला माझी कातडी जाडी करावी लागली, ड्युक बॉलपेक्षाही अधिक जाडी.

२०१४ मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यात ओव्हल येथे समालोचन करत असताना ५९ वर्षीय शास्त्रींनी एक किस्सा उघड केला. बीसीसीआयने मला दुसऱ्या दिवशी संघ संचालक म्हणून कार्यभार स्वीकारण्यास सांगितले. भडक माजी क्रिकेटपटू म्हणाला की तो येताना दिसत नाही.

''मला कोणतीच कल्पना नव्हती. २०१४च्या इंग्लंड दौऱ्यावर ओव्हल कसोटी समालोचन करताना मला सहा ते सात मिस्ड कॉल आले. काय घडलं? बीसीसीआयने मला सांगितले कोणत्याही परिस्थितीत उद्यापासून तुला संघ संचालकाचा कार्यभार सांभाळायचा आहे. मी त्यांना म्हणालो, मला माझ्या कुटुंबीयांशी आणि व्यावसायीक भागीदारांशी बोलावे लागेल, परंतु ते म्हणाले हे सर्व आम्ही पाहतो. अशा प्रकारे मी समालोचकाच्या बॉक्मधून संचालकपदी आलो,''असे शास्त्री म्हणाले.