Join us

चार पैकी फेव्हरेट बॉलिवूड अभिनेत्री कोण? गौतम गंभीरनं दोन नावांचा केला खुलासा, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 15:46 IST

Open in App
1 / 10

भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि भाजपाचा विद्यमान खासदार गौतम गंभीर त्याच्या विधानांमुळं नेहमीच चर्चेत असतो. क्रिकेट जगतातील घडामोडींवर भाष्य करून खेळाडूंची कधी स्तुती तर कधी त्यांचं मोकळ्यापणाने कौतुक करणारा गंभीर भारताच्या विश्वविजेत्या संघाचा सदस्य राहिला आहे.

2 / 10

गौतम गंभीरनं अलीकडेच मनोरंजन क्षेत्रातील त्याच्या दोन आवडत्या अभिनेत्रींचा खुलासा करून अनेकांना आश्चर्यचकित केले. क्रिकेटनंतर राजकीय खेळी खेळत असलेल्या गंभीरला त्याच्या तापट स्वभावासाठी देखील ओळखलं जातं.

3 / 10

गंभीरने न्यूज १८ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. २०११ च्या वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गौतम गंभीरनं मोठी खेळी करून भारताला विश्वविजेता बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

4 / 10

त्यानं इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२३ मध्ये लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघासाठी मार्गदर्शक म्हणूनही काम केलं. तो सध्या दिल्लीतून खासदार आहे.

5 / 10

गंभीर सामान्यत: क्रीडा क्षेत्राबाहेरील विषयांवर चर्चा करणे टाळत असला तरी, जूनमध्ये न्यूज १८ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याची वेगळी बाजू दिसून आली.

6 / 10

या मुलाखतीत त्याला बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण आणि परिणिती चोप्रा यांच्यापैकी आवडत्या अभिनेत्रींची निवड करण्यास सांगितलं.

7 / 10

कठीण प्रश्नावर व्यक्त होताना गंभीरनं सावध पवित्रा घेतला. त्यानं आलियाचं विशेषत: 'गंगूबाई काठियावाडी'मधील तिच्या भूमिकेचं कौतुक केलं.

8 / 10

दरम्यान, गौतम गंभीरनं त्याच्या आवडत्या अभिनेत्री म्हणून आलिया भट्ट आणि परिणीती चोप्रा यांची निवड केली.

9 / 10

आगामी आयपीएल हंगामात गंभीर लखनौच्या फ्रँचायझीची साथ सोडणार असल्याचं कळतं. तो कोलकाता नाईट रायडर्समध्ये (केकेआर) सामील होण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे गंभीरने यापूर्वी केकेआरला संघाचा कर्णधार म्हणून दोन वेळा विजेतेपद मिळवून दिले होते.

10 / 10

टॅग्स :गौतम गंभीरअनुष्का शर्मादीपिका पादुकोणपरिणीती चोप्राआलिया भट
Open in App