Ravindra Jadeja: सासरे मोठे उद्योगपती तर पत्नी राजकारणी! जाणून घ्या रवींद्र जडेजाची मनोरंजक लव्हस्टोरी

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : रविंद्र जडेजाने आशिया चषकातील पहिल्याच सामन्यात 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून भारताला विजय मिळवून दिला.

सध्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. मोठ्या विश्रांतीनंतर संघात पुनरागमन केलेल्या अष्टपैलू रविंद्र जडेजाने पहिल्याच सामन्यात शानदार खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. रविंद्र जडेजा आणि त्याची पत्नी रीवा सोलंकी यांची प्रेमकहाणी खूप मनोरंजक आहे. रीवा हिने राजकोटच्या आत्मिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून मॅकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. तिला वाचनाची आवड असून तिने यूपीएससीची तयारीही केली होती.

रवींद्र जडेजाची बहीण नैना हिची रिवा सोलंकी ही खूप चांगली मैत्रीण आहे. एका पार्टीत तिने जडेजा आणि रिवा सोलंकी यांची भेट घडवून आणली होती. यानंतर जडेजा-रीवा यांची जवळीक वाढू लागली आणि हळहळू दोघांच्या नात्याचे प्रेमात रूपांतर झाले. 2017 मध्ये दोघेही एका मुलीचे पालक झाले. मात्र दोघांनाही त्यांच्या मुलीला सोशल मीडियापासून दूर ठेवायचे आहे.

रवींद्र जडेजाची पत्नी रीवा सोलंकी हिचा जन्म 1990 मध्ये झाला होता. रीवा सोलंकी हिचे वडील हरदेवसिंग सोलंकी हे पेशाने व्यापारी आहेत. रीवाच्या वडीलांच्या दोन खासगी शाळा आणि हॉटेल आहे. रीवा सोलंकी स्वतः २०१९ मध्ये भाजपशी संबंधित होती. तसेच तिने करणी सेनेच्या महिला विभाग प्रमुख पदाची जबाबदारीही सांभाळली आहे.

रीवा ही आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. दरम्यान, 17 एप्रिल 2016 रोजी जडेजा आणि रिवा हे विवाहबंधनात अडकले. लग्नाआधीच जडेजाला त्याच्या सासरच्यांनी सुमारे 1 कोटी किंमतीची ऑडी क्यू7 कार भेट दिली होती. दोघांचे लग्नही मोठ्या थाटामाटात पार पडले.

एक प्रभावशाली अष्टपैलू खेळाडू म्हणून रविंद्र जडेजाची जगभर ख्याती आहे. तसेच जगातील नंबर वन फिल्डरमध्ये त्याला पाहिले जाते. संघाला गरज असताना त्याने अनेकवेळा ताबडतोब फलंदाजी करून निर्णायक भूमिका पार पाडली आहे. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात याचाच प्रत्यय पाहायला मिळाले. जडेजाने केलेल्या 35 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताला विजय मिळवता आला.