Join us

WPL Auction 2023: "WPL मध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले...", विराटला प्रपोज करणारी खेळाडू राहिली अनसोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 16:00 IST

Open in App
1 / 10

महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे. काल महिला प्रीमियर लीगसाठी मुंबईत लिलाव पार पडला. पाच फ्रँचायझींनी 87 खेळाडूंवर 59.50 कोटी रुपये खर्च करून पहिला WPL लिलाव संपवला. BCCI ने लिलावासाठी 409 खेळाडूंची निवड केली होती, ज्यात 270 भारतीयांचा समावेश होता.

2 / 10

भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना महिला प्रीमियर लीगच्या (WPL) लिलावात सर्वाधिक मानधन घेणारी खेळाडू ठरली. तिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) 3.40 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले.

3 / 10

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने 1.80 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले. याशिवाय मुंबई इंडियन्सने इंग्लंडच्या नॅट शीव्हर ब्रंटला 3.20 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले.

4 / 10

तर भारताची अष्टपैलू दीप्ती शर्मा हिला यूपी वॉरियर्सने 2.60 कोटी रुपयांना संघात घेतले. आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेली शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांना दिल्ली कॅपिटल्सने अनुक्रमे 2 आणि 2.20 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात घेतले.

5 / 10

अष्टपैलू पूजा वस्त्राकर (मुंबई इंडियन्स) आणि रिचा घोष (आरसीबी) यांनाही प्रत्येकी 1.90 कोटींची बोली लागली. विदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ऍशले गार्डनरला गुजरात जायंट्सने 3.2 कोटींमध्ये खरेदी केले. तर इंग्लंडच्या नॅट सायव्हर-ब्रंटला मुंबईकडून तेवढीच रक्कम मिळाली.

6 / 10

पण, महिला प्रीमियर लीगच्या लिलावात काही खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत. यामध्ये इंग्लंडची स्टायलिश खेळाडू डॅनिश व्यॉटच्या नावाचाही समावेश आहे.

7 / 10

खरं तर डॅनिश व्यॉट विराट कोहलीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिने 2014 मध्ये ट्विटच्या माध्यमातून विराट कोहलीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता.

8 / 10

याशिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची डॅनिश व्यॉट खास मैत्रीण आहे. ती 50 लाखांच्या मूळ किमतीसह महिला प्रीमियर लीगच्या लिलावाच्या रिंगणात होती.

9 / 10

मात्र, डॅनिश व्याटला खरेदी करण्यात कोणत्याच फ्रँचायझीने रस दाखवला नाही आणि ती अनसोल्ड राहिली. अनसोल्ड राहिल्यानंतर तिने स्वप्नभंग झाले असल्याची भावना व्यक्त केली आहे.

10 / 10

डॅनिश व्याटने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, 'महिला प्रीमियर लीगमध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. खरेदी झालेल्या सर्वांचे अभिनंदन. क्रिकेट खेळण्यासाठी भारत हे एक अद्भुत ठिकाण आहे.'

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगस्मृती मानधनाविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरइंग्लंड
Open in App