Join us

Richest Women Cricketers: महिला क्रिकेटर्सच्या श्रीमंतीची गोष्ट; टॉप ५ मध्ये ३ भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 23:58 IST

Open in App
1 / 9

क्रिकेटच्या मैदानात खास छाप सोडत महिला क्रिकेटर्संही आपला एक वेगळा चाहता वर्ग कमावताना पाहायला मिळत आहे.

2 / 9

भारतीय संघातील स्मृती मानधना हिला तर नॅशनल क्रशचा टॅग लागल्याचे दिसते. सध्याच्या घडीला ती क्रिकेटच्या मैदानातील क्वीन होऊन अधिराज्य गाजवताना दिसते.

3 / 9

क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय स्मृती मानधना कमाईच्या बाबतीतही आघाडीवर असलेल्या क्रिकेटर्सपैकी एक आहे.

4 / 9

इथं एक नजर टाकुयात महिला क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर्स कोण? स्मृती टॉप ५ मध्ये कितव्या स्थानी आहे? त्यासंदर्भातील खास गोष्ट

5 / 9

ऑस्ट्रेलियाची ऑलराउंडर एलिस पेरी ११६ कोटी रुपये नेटवर्थसह सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर्सच्या यादीत अव्वलस्थानावर आहे. WPL मधील सर्वात महागड्या महिला क्रिकेटपैकी एक असलेली ही सुंदरी वेगवेगळ्या लीगसह जाहिरातीच्या माध्यमातून तगडी कमाई करते.

6 / 9

माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लेनिंगचं नेटवर्थ हे ७५ कोटींच्या घरात आहे. महिला क्रिकेटमधील ती सर्वोत यशस्वी कॅप्टनपैकी एक आहे.

7 / 9

भारतीय महिला क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारी मिताली राज सुमारे ४२ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. महिला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीतही ती अव्वलस्थानी आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत मिताली कॉमेंट्री पॅनलचा भाग आहे. हे देखील तिच्या कमाईचं एक माध्यम झाल्याचे दिसते.

8 / 9

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर जवळपास २५ कोटी रुपयांच्या संपत्तीसह श्रीमंत महिला क्रिकेटरच्या यादीत टॉप ५ मध्ये दिसते.

9 / 9

टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५स्मृती मानधनाहरनमप्रीत कौरमिताली राज