Join us

"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 09:52 IST

Open in App
1 / 8

भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याने टीम इंडियातील काही गुपिते चाहत्यांना सांगितली. महेंद्रसिंग धोनीने दिनेश कार्तिकला 'गिरगिट' म्हणजेच रंग बदलणारा सरडा बनण्यास भाग पाडले, असे कार्तिक म्हणाला.

2 / 8

कार्तिकने धोनीच्या तीन महिने आधी २००४ मध्ये भारतासाठी पदार्पण केले होते, परंतु धोनीच्या आगमनानंतर त्याला संघात स्थान मिळवणे खूप कठीण झाले. धोनीने कारकिर्दीची वादळी सुरुवात करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते.

3 / 8

लवकरच धोनी भारताचा आघाडीचा यष्टीरक्षक-फलंदाज बनला आणि नंतर कर्णधारही बनला. धोनीने प्रदीर्घ काळ आपली संघातील जागा टिकवून ठेवली. पण आता दिनेश कार्तिकने त्याच्याबद्दल एक विधान केले आहे.

4 / 8

कार्तिक म्हणाला, 'राहुल द्रविड त्यावेळी विकेटकीपिंग करत होता, पण तो स्वतः म्हणाला होता की तो फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रित करू इच्छितो. तेव्हा संघाला कायमस्वरूपी विकेटकीपरची गरज होती.'

5 / 8

'मला थोड्या काळासाठी संधी मिळाली, पण मुख्य किपरची भूमिका बहुतेक महेंद्रसिंग धोनीसाठीच बनवण्यात आली होती. कारण तो संघामध्ये आला आणि सर्वकाही बदलले.'

6 / 8

'धोनीच्या यशानंतर मला संघात बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या. मी सरड्याप्रमाणे अनेक भूमिका बदलून खेळाशी जुळवून घेतले. सलामीवीरासाठी जागा मिळाली तेव्हा तामिळनाडूसाठी सलामीवीर झालो.'

7 / 8

'जेव्हा मधल्या फळीत गरज होती, तेव्हा तिथे फलंदाजी केली. पण खरे आव्हान संघातील स्थान मिळवण्यापेक्षा ते कायम राखण्याचे होते. अनेक वेळा मी त्या दबावामुळे सर्वोत्तम कामगिरी करू शकलो नाही.'

8 / 8

'कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षांत मी ६ आणि ७व्या क्रमांकावर फलंदाजी केली, जे सोपे नव्हते, परंतु मी ते स्वीकारले. धोनीने मला खूप काही शिकवले. लवचिकता, धैर्य आणि संयम हे मी त्याच्याकडून शिकलो. '

टॅग्स :दिनेश कार्तिकमहेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघराहुल द्रविड