Devon Conway Wedding: कॉनवेच्या प्री-वेडिंग पार्टीत CSKच्या खेळाडूंचा लुंगी डान्स, धोनीही दिसला अनोख्या अवतारात; पाहा Photos

IPL 2022 Cennai Super Kings: चेन्नई सुपर किंग्स संघ व्यवस्थापनाने त्यांचा खेळाडू डेव्हॉन कॉनवेसाठी मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते. यात संघातील सर्व खेळाडू पारंपारिक पोषाखात दिसले.

IPL 2022 Cennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीग(IPL) मधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्स (CSK)ची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. सीएसकेला यंदाच्या मोसमात सलग पराभवाचा सामना करावा लागत आहे. तरीदेखील संघातील खेळाडू मोठा उत्सव साजरा करताना दिसत आहेत.

हा उत्सव चेन्नईमधील न्यूझीलंडचा फलंदाज आणि चेन्नईचा खेळाडू डेव्हॉन कॉनवेच्या लग्नाचा आहे. कॉनवे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. लग्नापूर्वी चेन्नईच्या टीमने कॉनवेला प्री-वेडिंग पार्टी दिली होती. त्याचे काही फोटो चेन्नईने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये चेन्नईचे सर्व खेळाडून पारंपारिक पोषाखात(लुंगी) दिसत आहेत. चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीदेखील कॉनवेच्या प्री-वेडिंग पार्टीत होता. यावेळी त्याने पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि लुंगी घातली होती. तर कॉनवे पांढरा कुर्ता आणि लुंगीमध्ये आला होता.

30 वर्षीय डेव्हॉन कॉनवे त्याची गर्लफ्रेंड किम वॉटसनसोबत लग्नाच्या बेडीत अडकत आहे. डेव्हन सध्या आयपीएलसाठी भारतात आहे, तर त्याची गर्लफ्रेंड किमही व्हिडिओ कॉलद्वारे पार्टीत सामील झाली होती.

कॉनवेच्या प्री-वेडिंग पार्टीत चेन्नई संघाचे सर्व खेळाडू पारंपरिक लुंगीमध्ये दिसले. या पार्टीत चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजा आणि धोनीसह मिचेल सँटनर, इंग्लंडचा मोईन अली, शिवम दुबे याच्यासह सर्व सहकारी खेळाडू आणि कर्मचारी होते.

चेन्नई फ्रँचायझीने डेव्हॉन कॉनवेला ही पार्टी मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये दिली. आयपीएल 2022 सीझनसाठी चेन्नईचा संघही या हॉटेलमध्ये थांबला आहे. पार्टीत डेव्हॉन कॉनवेसोबतच सर्व खेळाडूंनी लुंगीमध्ये डान्स केला.

आयपीएलमधील न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉनवेचा हा पहिलाच हंगाम आहे. त्याने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला असून, त्यात त्याने फक्त 3 धावा केल्या आहेत.

प्री-वेडिंग पार्टीत धोनी आणि जडेजासह सर्व खेळाडू आणि कर्मचाऱ्यांनी कॉनवेला लिफाफेही दिले. या पार्टीत केकही कापण्यात आला. यासोबतच सर्व खेळाडूंनी जोरदार डान्स केला.

कॉनवेला चेन्नई फ्रँचायझीने मेगा लिलावात विकत घेतले होते. चेन्नईने कॉनवेवर एक कोटी रुपयांची बोली लावली होती.