Join us

Salute: कोरोनामुळे निधन झालेल्या पोलिसाच्या कुटुंबासाठी Gautam Gambhir चं मोठं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 15:22 IST

Open in App
1 / 10

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 56,409 वर पोहोचला असून 16,790 रुग्ण बरे झाले आहेत. 1890 जणांना प्राण गमवावे लागले. यामध्ये आरोग्य सेवक, डॉक्टर्स, पोलीस यांचाही समावेश आहे.

2 / 10

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी डॉक्टर्स व पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्यामुळे सामान्य नागरीक आपापल्या घरी सुरक्षित आहे. पण, या लढ्यात काही पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले.

3 / 10

नुकतेच नवी दिल्लीतील एक कॉन्स्टेबल अमित यांना कोरोना व्हायरसमुळे प्राण गमवावे लागले. त्यांच्या या बलिदानाला सलाम ठोकत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनं मोठं पाऊल उचललं आहे.

4 / 10

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचा खासदार गंभीर नेहमीच पुढे आला आहे. त्यानं दिल्ली सरकारला 1 कोटींचा निधी दिला.

5 / 10

त्याशिवाय त्यानं पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दोन वर्षांचा पगार दान करण्याचा निर्णयही घेतला. शिवाय तो गौतम गंभीर फाऊंडेशनतर्फे PPE मास्कचं वाटपही करत आहे.

6 / 10

गौतम गंभीर फाऊंडेशनतर्फे गरजूंना अन्नाचं वाटपही केलं जात आहे. गौतमनं 2018मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

7 / 10

त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर त्यांन पूर्वी दिल्लीतील खासदारकीचा निवडणूक जिंकली. आयुष्याच्या या नव्या इनिंममध्येही गंभीर योद्ध्याप्रमाणे लढत आहे.

8 / 10

त्यानं काही दिवसांपूर्वी त्याच्या घरी काम करणाऱ्या मोलकणीचे स्वतः अंत्यसंस्कार केले. लॉकडाऊनमुळे तिला तिच्या कुटुबीयांकडे पोहचवणे शक्य नसल्यानं गंभीरनं हे मोठं कार्य केलं.

9 / 10

आता गंभीरमधील सामाजिक भान जपणारा माणून पुन्हा एकदा दिसला. गुरुवारी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल अमित यांचे कोरोनामुळे निधन झाले.

10 / 10

गंभीरनं अमित यांच्या निधनानंतर केवळ श्रद्धांजली वाहिली नाही. तर त्यानं अमित यांच्या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार असल्याचा निर्णय घेतला. त्यानं लिहिलं की,''प्रशासन, यंत्रणा आणि दिल्ली अपयशी ठरली. कॉन्स्टेबल अमित यांना आपण परत आणू शकत नाही, परंतु मी एक खात्री देतो की त्यांच्या मुलांची मी काळजी घेईन, अगदी माझ्या मुलांसारखी. गौतम गंभीर फाऊंडेशन त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलत आहे.''

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यागौतम गंभीरपोलिस