सरफराजनं २ महिन्यात १७ किलो वजन कमी करून दाखवलं! दिग्गज क्रिकेटरनं पृथ्वीला मारला टोमणा

भारतीय कसोटी संघातून वगळल्यावर मिळालेल्या मोकळ्या वेळात तो फिटनेवर भर देतोय. त्याचा उत्तम रिझल्टही मिळालाय.

टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी सरफराज खान सरावासोबतच जिममध्ये घाम गाळताना दिसतोय.

भारतीय कसोटी संघातून वगळल्यावर मिळालेल्या मोकळ्या वेळात तो फिटनेवर भर देतोय. दोन महिन्यात १७ किलो वजन कमी करून दाखवत त्याने कमालीच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसह सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे.

सरफराज खान याला इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियात स्थान मिळाले नाही. अधिक वजन असल्यामुळे २७ वर्षीय क्रिकेटर ट्रोल झालाय. एवढेच नाही तर टीम इंडियात सिलेक्शनसाठीही ही गोष्ट त्याच्या आडवी आलीये.

आता सरफराज खान याने जिममध्ये कठोर मेहनत घेत सर्वांनी आदर्श घ्यावा असा फिटनेसचा फंडा जपल्याचे दिसते. त्याचा नवा लूक सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

इंग्लंडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसन याने तर सरफराजचे कौतुक करताना थेट पृथ्वी शॉला टोमणा मारला आहे.

सर्वोत्तम प्रयत्न, फिटनेसवर घेतलेली मेहनत मैदानातील कामगिरी करण्याच्या कामी येईल, असे म्हणत केविन पीटरसन याने सरफराजला शाब्बासकी दिलीये.

पृथ्वी शॉ ही फिटनेसच्या मुद्यावरून चर्चेत राहिला होता. मुंबई क्रिकेट संघातून आउट होण्याची वेळही त्याच्यावर आली. आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो महाराष्ट्र संघाकडून खेळताना दिसणार आहे. फिटनेसवर भर देणार असल्याची गोष्ट त्याने बोलूनही दाखवलीये. तो सरफराज प्रमाणे फिटनेस गोल साध्य करणार का? ते पाहण्याजोगे असेल.