'ब्लू और यलो?'; चाहत्याच्या यॉर्कर प्रश्नावर धोनीचा हेलिकॉप्टर षटकार

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणजे महेंद्रसिंग धोनी. धोनीच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक तीनवेळा आयसीसीचा किताब पटकावला.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणजे महेंद्रसिंग धोनी. धोनीच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक तीनवेळा आयसीसीचा किताब पटकावला.

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केले असले तरी त्याची झलक आयपीएलच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेला धोनी सोशल मीडियातून चाहत्यांना भेटतो.

नेहमी काही ना काही कारणावरून चर्चेचा भाग बनतो. सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धएत यंदाचा वर्ल्डकप भारत जिंकेल असा विश्वास धोनीने देखील व्यक्त केला.

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, विविध मुलाखतींच्या माध्यमातून तो चाहत्यांना भेटतोय. त्यामुळेच, सोशल मीडियावरही त्याचे व्हिडिओ समोर येत आहेत.

नुकतेच, सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने भारताचा स्टार क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यासाठीही तो वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये दिसून आला.

दरम्यान, एका मुलाखतीत त्याने पती-पत्नीच्या नात्यावर भाष्य करताना अविवाहितांना मोलाचा सल्लाही दिला. धोनीच्या या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरलही झाला.

आता, धोनीला चाहत्याने विचारलेला आणखी एक प्रश्न आणि त्यावर धोनीने दिलेलं उत्तरही चांगलंच व्हायरल होत आहे. कारण, चाहत्याने प्रश्नाच्या माध्यमातून यॉर्कर टाकला, पण धोनीने हेलिकॉप्टर शॉट मारत षटकार लगावला.

धोनी टीम इंडियाच विश्वविजेता कर्णधार आहे, तर आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा ५ वेळा चॅम्पियन कर्णधार राहिला आहे. त्यामुळे, दोन्ही संघ त्यांच्यासाठी दोन्ही संघाच्या चाहत्यांसाठी तो खास आहे.

दरम्यान, एका चाहत्याने धोनीला कोड्यात टाकणारा प्रश्न केल होता. ब्लू की यलो? असं म्हणत भारत की सीएसके पैकी एक पर्याय निवडण्याचं सूचवलं होतं. मात्र, धोनी हटके उत्तर देऊन सर्वांचं मन जिंकलं.

तुम्ही खूप साधा प्रश्न विचारला आहे, पण अतिशय ट्रिकी आहे. मी १०० टक्के ब्लूसोबत जाईल. कारण, मला माहितीय के लोक येलोला पसंत करतात, ते ब्लूसंदर्भात कधीच प्रश्न करणार नाहीत, असे जशास तसे उत्तर धोनीने दिले.

धोनीच्या या उत्तरावर उपस्थित सर्वांनीच टाळ्या वाजवून दाद दिली. त्यामुळे, केवळ मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही धोनी हेलिकॉप्टर शॉट खेळतोय, असेच म्हणावे लागेल.

धोनीने आयपीएल २०२४ मध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. "मी केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, आयपीएलमधून नाही, असे धोनी म्हटले आहे.