टीम इंडियाचा स्टार ऑल राउंडर अक्षर पटेल याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत गूडन्यूज शेअर केली आहे.
अक्षर पटेलची पत्नी मेहा पटेल ही प्रेग्नंट असून क्रिकेटरनं खास पोस्ट शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. खास पोस्टमध्ये त्याने पत्नी मेहालाही टॅग केल्याचे दिसून येते.
अक्षर पटेल हा 'बापू' या नावाने लोकप्रिय आहे. त्यामुळे टीम इंडियातील 'बापू' लवकरच बाबा होणार आहे, ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे.
२६ जानेवारी २०२३ मध्ये अक्षर पटेल आणि मेहा यांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती.
अक्षर आणि मेहा यांची लव्हस्टोरीही एकदम झक्कास आहे. अनेक वर्षे एकमेकांसोबत डेटिंग केल्यावर दोघांनी प्रेमाची भागीदारी एकत्ररित्या फुलवण्याचा निर्णय घेतला होता.
अक्षर पटेल हा टीम इंडियातील एक प्रमुख खेळाडू आहे. दुसरीकडे त्याची पत्नी मेहा एक न्यूट्रिशनिस्ट आहे.
एका बाजूला फिल्डवर अक्षर पटेलचा जलवा पाहायला मिळतो. याउलट फिल्डबाहेर मेहा सोशल मीडियावरील व्हिडिओच्या माध्यमातून हवा करताना दिसते.
अक्षर पटेल आणि मेहा यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून दोघांच्यातील प्रेमाची एक खास झलक वेळोवेळी पाहायला मिळाली आहे. आता ही जोडी नव्या पाहण्याच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.