Australia thrash Pakistan : बाबर आजमने मोडला Virat Kohliचा विश्वविक्रम, पण ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या फळीने पाकिस्तानचे नाक कापले

Australia thrash Pakistan - ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन डे सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवला. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केवळ १२ खेळाडूंमधून अंतिम ११ खेळाडू मैदानावर उतरवताना ऑस्ट्रेलियाने यजमानांचे नाक कापले.

Australia thrash Pakistan - ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन डे सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवला. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केवळ १२ खेळाडूंमधून अंतिम ११ खेळाडू मैदानावर उतरवताना ऑस्ट्रेलियाने यजमानांचे नाक कापले.

ऑस्ट्रेलियाने समोर ठेवलेल्या ३१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार बाबर आजमने ( Babar Azam) विश्वविक्रमी खेळी केली, परंतु त्याची ही कामगिरी ऑसी गोलंदाजांनी व्यर्थ ठरवली.

ट्रॅव्हिस हेड व कर्णधार आरोन फिंच यांनी पहिल्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली आणि यात फिंचच्या केवळ २३ धावा होत्या. हेड ७२ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह १०१ धावांवर बाद झाला. मॅकडेरमोटने ७० चेंडूंत ४ चौकारांसह ५५ धावा केल्या. कॅमेरून ग्रीनने ३० चेंडूंत नाबाद ४० धावा केल्या.

मार्नस लाबुशेन ( २५), मार्कस स्टॉयनिस ( २६), सीन अबॉट ( १४) यांनीही योगदान दिले. पाकिस्तानच्या हरिस रौफ व जाहीदने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने ७ बाद ३१३ धावा केल्या. पाकिस्तानने १४ षटकांत १ बाद ६६ धावा केल्या आहेत.

प्रत्युत्तरात फाखर जमान ( १८) लगेच माघारी परतल्यानंतर इमान-उल-हक व बाबर आजम यांनी डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. बाबर ५७ धावांवर स्वीपसनच्या गोलंदाजीवर LBW झाला, पण त्याने एक मोठा विक्रम नोंदवला.

वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत ४०००+ धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पटकावले दुसरे स्थान. हाशिम आमलाने ८१, तर बाबरने ८२ डावांत ही विक्रमी कामगिरी केली आहे. त्याने व्हीव्ह रिचर्ड्स ( ८८), जो रूट ( ९१), विराट कोहली ( ९३) यांचा विक्रम मोडला.

बाबरच्या विकेटनंतर पाकिस्तानी फलंदाजांनी तंबूत परतण्याची शर्यत लावली. इमाम एका बाजूने खिंड लढवताना दिसला आणि त्याने ९६ चेंडूंत १०१ धावांची खेळी केली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४५.२ षटकांत २२५ धावांवर माघारी परतला आणि ऑस्ट्रेलियाने ८८ धावांनी हा सामना जिंकला.

अॅडम झम्पाने ३८ धावांत ४ विकेट्स घेतल्या. मिचेल स्वीपसन व ट्रॅव्हिस हेड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. शतक व दोन विकेट्स घेणाऱ्या हेडला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले. ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानातील वन डे क्रिकेटमधील पाकिस्तानविरुद्धचा हा सर्वात मोठा विजय ठरला.