ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध वर्चस्व गाजवले आहे. यात मार्नस लाबुशेन यानं मोठा विक्रम केलाय.
ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ४ बाद ५९८ धावांवर घोषित केला आणि प्रत्युत्तरात विंडीजचा संघ २८३ धावांवर गडगडला
फॉलोऑन न देता ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव २ बाद १८२ धावांवर घोषित करून विंडीजसमोर ४९८ धावांचे लक्ष्य ठेवले.
ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात मार्नस लाबुशेन ( २०४) आणि स्टीव्ह स्मिथ ( २००*) यांनी द्विशतक झळकावले.
मार्नसन लाबुशेन याने दुसऱ्या डावातही ११० चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह नाबाद १०४ धावांची खेळी केली.
एकाच कसोटीत द्विशतक व शतक झळकावणारा मार्नस लाबुशेन हा ऑस्ट्रेलियाचा तिसरा अन् जगातील ८वा फलंदाज ठरला.
यापूर्वी डॉज वॉल्टर्स ( वि. वेस्ट इंडिज, १९६९), सुनील गावस्कर ( वि. वेस्ट इंडिज, १९७१), लॉरेन्स रोव ( वि. न्यूझीलंड, १९७२), ग्रेग चॅपल ( वि. न्यूझीलंड, १९७४), ग्रॅहम गूच ( वि. भारत, १९९०), ब्रायन लारा ( वि. श्रीलंका, २००१), कुमार संगकारा ( वि. बांगलादेश, २०१४) यांनी हा पराक्रम केला आहे.