आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने त्याचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा हिने सूर्याचा ३५वा वाढदिवस खार पद्धतीने साजरा केला. सुरुवातीला तिने सूर्यकुमारच्या डोक्यावर विजयचा टिळा लावला. त्यानंतर तिने सूर्याच्या तोंडावर केक लावला.
दरम्यान, सूर्यकुमार यादव ने आपल्या ३५ व्या वाढदिवसा दिवशी देशवासियांना पाकिस्तानवरील दणदणीत विजयासह मोठं रिटर्न गिफ्ट दिलं आहे. पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर सूर्यकुमार यादवने वाढदिवसाचा केक कापला. तसेच पत्नी देविशाच्या उपस्थितीमुळे सूर्यकुमारसाठी हा वाढदिवस आणखीनच खास बनला.
सूर्यकुमार यादव पाकिस्तानचा पराभव करून सूर्यकुमार यादव जेव्हा हॉटेलमध्ये परतला, तेव्हा पत्नी देविशा हिने त्याचं स्वागत केलं. तसेच तिने सूर्यकुमारच्या मस्तकावर विजयाचा टिळा लावला. त्यानंतर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली.
सूर्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी देविशा हिने दोन केक आणले होते. त्यातील एक केक सूर्यकुमारच्या वाढदिवसासाठी आणला होता. तर दुसरा भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानिमित्त आणला होता. दरम्यान, वाढदिवस साजरा केल्यानंतर देविशा हिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ‘’हॅप्पी बर्थडे माय स्पेशल वन’’ अशा शब्दात सूर्यकुमार याला शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. सूर्यकुमार यादव याने ३७ चेंडून ४७ धावांची नाबाद खेळी करत भारताचा विजय निश्चित केला होता. एवढंच नाही तर अखेरीस षटकार ठोकत भारताच्या विजयावर दिमाखात शिक्कामोर्तबही केलं होतं.