Asia Cup 2022: अफगाणिस्तानच्या जबरा फॅनचा सोशल मीडियावर जलवा; फोटो पाहून चाहते घायाळ

सध्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. मंगळवारी अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने दणदणीत विजय मिळवून सुपर-४ मध्ये स्थान मिळवले आहे.

अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये रंगलेल्या सामन्यादरम्यान अफगाणिस्तानच्या एका फॅनने सर्वांचेच लक्ष वेधले. या महिला फॅनचे नाव वाझमा अयूबी असे असून ती अफगाणिस्तानच्या संघाची जबरा फॅन आहे. अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान तिचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. वाझमाचे फोटो #Superfan सोबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले आहेत.

ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी वाझमा अयूबीला गुगलवर देखील सर्च करत आहेत. अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या या फॅनबद्दल प्रत्येकजण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

खुद्द वाझमा हिने व्हायरल झालेल्या ट्विटर पोस्टला रिट्विट केले आहे. लोक तिच्या नावाचा टॅग वापरून तिचे फोटो सतत ट्विट करत आहेत. एका युजर्सने तिला टॅग करून मजेशीरपणे म्हटले, कृपया भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याला येऊ नका, अन्यथा भारतीय संघाचे चाहते देखील अफगाणिस्तानचा जयजयकार करतील.

वाझमाची वाढती लोकप्रिय पाहून लोक तिच्या फोटोंसहित व्हिडीओ देखील पोस्ट करत आहेत. अफगाणिस्तानच्या संघाचा उत्साह वाढवायला आपण आले असल्याचे तिने सांगितले आहे. वाझमा अयूबाची स्पष्ट ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र वाझमाने तिच्या ट्विटर प्रोफाईलवर स्वतःचे वर्णन क्रिप्टो गुंतवणूकदार म्हणून केले आहे आणि म्हटले आहे की तिला रिअल इस्टेटमध्ये देखील खूप आवड आहे.

आशिया चषक २०२२ ही स्पर्धा अफगाणिस्तानच्या संघासाठी शानदार ठरत आहे. कारण संघाने आपल्या पहिल्या दोन्हीही सामन्यात दणदणीत विजय मिळवून सुपर-४ फेरी गाठली आहे. आपल्या सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तानने यजमान श्रीलंकेचा धुव्वा उडवला तर दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा दारूण पराभव केला.