Join us
Daily Top 2Weekly Top 5

'भाभी चार टेस्ट और...' विराट चाहत्यानं अनुष्काला हात जोडून केली ही विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 21:30 IST

Open in App
1 / 8

बॉर्डर- गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियासह विराट कोहलीनं धमाक्यात सुरुवात केलीये.

2 / 8

वर्षभरानंतर पर्थच्या मैदानात किंग कोहलीच्या भात्यातून शतक पाहायला मिळाले. रन मशिन विराटच्या शतकाची अनुष्का शर्माही साक्षीदार होती.

3 / 8

बऱ्याच दिवसांनी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा ही त्याला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थितीत राहिल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर अनुष्का ही विराट कोहलीसाठी लकी चार्म आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे.

4 / 8

अनुष्का शर्मानं इन्स्टाग्राम अकाउंटवरून आपला एक खास फोटो शेअर केला होता. तिच्या या फोटोवर लाईक्स कमेंट्सची बरसात झाली. पण एक कमेंट लक्षवेधी ठरली.

5 / 8

या कमेंटमधून विराटसह टीम इंडियाच्या चाहत्याने अनुष्का शर्माला खास विनंती केल्याचे दिसते. उर्वरित ४ कसोटी सामन्यात तिने विराट कोहलीसोबत थांबावे, अशा आशयाची ही कमेंट आहे. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.

6 / 8

विराट कोहली स्वत: पत्नी अनुष्का शर्माला आपली लकी चार्म मानतो. अनेकदा त्याने आपल्या यशाचं श्रेय तिला दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

7 / 8

रवी शास्त्रींनीही विराटसाठी अनुष्का लकी चार्म असल्याचा किस्सा शेअर केला होता. ज्याची चांगलीच चर्चा रंगली होती.

8 / 8

पर्थच्या मैदानात विराट कोहलीनं शतक साजरे केल्यावर शास्त्रींनी २०१५ चा किस्सा शेअर केला होता. शास्त्री म्हणाले होते की, २०१५ मध्ये मी टीम इंडियाचा कोच असताना विराट कोहली आणि अनुष्का एकमेकांसोबत डेट करत होते. त्यावेळी अनुष्काला मॅचसाठी एन्ट्री मिळावी, अशी विनंती कोहलीनं केली होती. बीसीसीआयशी चर्चा करून अनुष्काला मॅचला उपस्थितीत राहण्याची परवानगी दिली होती, असे ते म्हणाले होते. हा व्हिडिओही चांगलाच चर्चेत आला होता.

टॅग्स :ऑफ द फिल्डविराट कोहलीअनुष्का शर्माआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ