टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची धनश्री वर्मा यांच्यातील नाते तुटलं असून दोघे वेगळे होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगताना दिसते.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यातील नात्यात मिठाचा खडा पडण्यामागे भारतीय स्टार क्रिकेटर श्रेयस अय्यर कारणीभूत असल्याचा दावाही ठोस पुराव्या अभावी करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. एका बाजूला ही चर्चा रंगत असताना अय्यर आणि चहल जोडी लोकप्रिय शोमध्ये झळकणार असल्याचे समोर येत आहे.
बिग बॉस १८ च्या 'विकेंड वॉर'मध्ये युजवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर या दोघांत तिसरा असा सीन पाहायला मिळेल. हा चेहराही लक्षवेधी ठरेल. यासंदर्भात आयोजकांकडून कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बिग बॉस १८ च्या हंगामातील अंतिम विकेंड वॉर एपिसोड ११ आणि १२ जानेवारीला चाहत्यांना पाहता येईल. ज्यात अय्यर आणि चहलसह आणखी एका नव्या क्रिकेटरची झलक पाहायला मिळेल.
श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल आगामी आयपीएल हंगामात पंजाब किंग्सच्या ताफ्यातून एकत्र खेळताना पाहायला मिळणार आहे. याच संघातील त्यांचा सहकाही शशांक सिंगही बिग बॉसच्या खास एपिसोडमध्ये हजेरी लावणार असल्याचे बोलले जाते.
श्रेयस अय्यरची याआधी नेटफ्लिक्सवरील 'द ग्रेड इंडियन कपिल शो' या कार्यक्रमात झलक पाहायला मिळाली होती.
युजवेंद्र चह बद्दल बोलायचं तर कपिल शर्माच्या शोच्या माध्यमातून तोही याआधी रिअॅलिटी शोमध्ये दिसला आहे.
पंजाबच्या ताफ्यातील शशांक सिंग हा पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या शोमध्ये झळकणार आहे.