Join us

टीम इंडियातील ८ सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटू, त्यातील तिघी आहेत जगातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 00:18 IST

Open in App
1 / 9

गेल्या काही वर्षांमध्ये भारतात पुरुषांच्या क्रिकेटसोबत महिला क्रिकेटची लोकप्रियताही खूप वाढली आहे. त्यांच्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असतं. दरम्यान, भारतातील १० सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंपैकी तिघी जणी ह्या जगातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू आहेत.

2 / 9

या यादीमध्ये पहिलं नाव स्मृती मंधानाचं आहे. सोशल मीडियावर फॅन्स तिला नॅशनल क्रश म्हणून ओळखतात. तिची नेटवर्थ ३३ कोटी रुपये एवढी आहे.

3 / 9

वेदा कृष्णमूर्ती भारताची अष्टपैलू महिला क्रिकेटपटू आहे. तिने १८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. सध्या ती संघाबाहेर आहे.

4 / 9

हिमाचल प्रदेश आणि टीम इंडियासाठी खेळणारी हरलीन देओल अष्टपैलू खेळाडू आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तसेच इन्स्टाग्रामवर आपले फोटो शेअर करत असते.

5 / 9

भारताची माजी कर्णधार मिताली राज ही उत्तम फलंदाज होती. त्या बरोबरच ती उत्तम भरतनाट्यम डान्सरही आहे. सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटूंच्या यादीत मिताल तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिची नेटवर्थ ४१ कोटी रुपयांहून अधिक आहे.

6 / 9

प्रिया पूनिया हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा तिच्या खेळाबरोबरच तिच्या सौंदर्याने लक्ष वेधून घेतलं होतं. प्रिया तिच्या सुंदर फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.

7 / 9

भारताची यष्टीरक्षक फलंदाज तानिया भाटियाने हिने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. इन्स्टाग्रामवर तिचे भरपूर फॉलोअर्स आहेत.

8 / 9

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटूंमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. तिची एकूण नेटवर्थ २५ कोटी रुपये आहेत.

9 / 9

२२ वर्षीय क्रिकेटपटू जेमिना रॉड्रिग्स हिची फॅनफॉलोविंग मोठी आहे. ती क्रिकेटबरोबरच हॉकी संघाचीही सदस्य होती. उत्तम फलंदाजी आणि आकर्ष लूकमुळे ती तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघमिताली राजस्मृती मानधनाहरनमप्रीत कौर
Open in App