Join us

ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:30 IST

Open in App
1 / 15

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने नवी मुंबईतील मैदानात रंगलेल्या यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत नवा इतिहास रचला आहे. १३ व्या हंगामात महिला क्रिकेट जगतात भारतीय संघाच्या रुपात नवा आणि चौथा चॅम्पियन मिळाला.

2 / 15

3 / 15

२०२५ मध्ये हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारताच्या लेकींनी देशासाठी सुवर्णमयी इतिहास रचला आहे.. इथं एक नजर टाकुयात भारतीय महिला संघासह महिला वर्ल्ड कपच्या इतिहासातील आतापर्यंतच्या विजेत्यांवर...

4 / 15

२०२२ च्या हंगामात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात फायनल सामना खेळवण्यात आला होता. ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडला पराभूत करत सातव्यांदा जेतेपद पटकावत या स्पर्धेतील आपली बादशाहत दाखवून दिली होती.

5 / 15

२०१७ च्या हंगामात भारतीय संघाने मिताली राजच्या नेतृत्वाखाली फायनलमध्ये धडक मारली होती. पण इंग्लंडच्या संघाने फायनल बाजी मारत भारतीय संघाचे स्वप्न उद्धस्त केलं होते. भारतीय महिला संघाने अवघ्या ९ धावांनी हा सामन्यासह पहिली वहिली ट्रॉफी जिंकण्याची संधी गमावली होती.

6 / 15

२०१३ मध्ये भारतात पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या महिला संघाने पहिल्यांदा फायनल गाठली होती. पण यावेळीही ऑस्ट्रेलियाने फायनल बाजी मारली होती.

7 / 15

२००९ मध्ये इंग्लंडच्या संघाने ऑस्ट्रेलियन मैदानात न्यूझीलंडला पराभूत करत तिसऱ्यांदा आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती.

8 / 15

२००५ च्या हंगामात भारतीय संघाने पहिल्यांदा महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली होती. दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात ऑस्ट्रेलियन संघा भारतीय संघाच्या स्वप्नाआड आला होता.

9 / 15

२००० च्या हंगामात न्यूझीलंडच्या संघाने घरऱ्या मैदानात रंगलेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करत पहिली वहिली स्पर्धा जिंकली होती.

10 / 15

१९९७ च्या हंगामात भारताच्या यजमानपदाखाली कोलकाताच्या मैदानात फायनल सामना खेळवण्यात आला. न्यूझीलंडला पराभूत करत ऑस्ट्रेलियाने जेतेपदाचा चौकार मारला होता.

11 / 15

१९९३ च्या हंगामात इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या यांच्यात फायनलचा थरार रंगल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडच्या संघाने वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले होते.

12 / 15

१९८८ मध्ये ऑस्ट्रेलियन महिला संघाने घरच्या मैदानात रंगलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत सलग तिसरी ट्रॉफी जिंकली होती. फायनमलध्ये त्यांनी इंग्लंडच्या संघाला पराभूत केले होते.

13 / 15

१९८२ च्या हंगामात न्यूझीलंडच्या मैदानात इंग्लंडची शिकार करत ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होते.

14 / 15

१९७८ मध्ये महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामातील स्पर्धा ही भारताच्या यजमानपदाखाली झाली. रॉबिन राउंड पद्धतीने खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत इंगलंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि भारतीय महिला संघाचा समावेश होता. ६ गुण खात्यात जमा करत ऑस्ट्रेलियन संघाने या हंगामात पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकला होता.

15 / 15

१९७३ मध्ये पहिल्यांदा भरवण्यात आलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंड, ऑस्ट्रेलियासह वर्ल्ड इलेव्हन न्यूझीलंड, त्रिनिनाद अँण्ड टोबॅको, जेमिका आणि यंग वूमन इंग्लंड या ७ संघांचा सहभाग होता. रॉबिन राउंड पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत यजमान इंग्लंड संघाने २० गुण मिळवत जेतेपद पटकावले होते. १७ गुणांसह ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर राहिला.

टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५भारतीय महिला क्रिकेट संघभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाआॅस्ट्रेलियाइंग्लंडन्यूझीलंड