MS धोनीसह ICC Hall Of Fame मधील ११ भारतीयांमध्ये २ महिला क्रिकेटर्सचाही समावेश

महेंद्रसिंह धोनी हा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सामील झालेला ११ भारतीय क्रिकेटर आहे, जाणून घ्या आतापर्यंत कोण कोणत्या भारतीयाला मिळालाय हा सन्मान

भारताचे दिग्गज लेफ्ट आर्म फिरकीपटू बिशन सिंग बेदी (Bishan Singh Bedi) यांचा देखील 'आयसीसी हॉल ऑफ फेम'च्या यादीत समावेश आहे. या दिग्गजाने ६७ कसोटी सामन्यात २६६ विकेट्स घेतल्या असून २२ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्वही केले आहे.

भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावाचा 'आयसीसी हॉल ऑफ फेम' मध्ये समावेश करण्यात आला आहे. हा सन्मान मिळालेला भारताचा तो ११ वा क्रिकेटर आहे. इथं एक नजर टाकुयात आतापर्यंत आयसीसीच्या प्रतिष्ठित अन् मानाचा सन्मान लाभलेल्या ११ भारतीय दिग्गज क्रिकेटर्सवर

भारतीय संघाकडून कसोटी आणि वनडेत सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या अनिल कुंबळे (Anil Kumble) या दिग्गजाच्या नावाचा २०१५ मध्ये 'आयसीसी हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश करण्यात आला होता. अनिल कुंबळे यांनी आपल्या कारकिर्दीत कसोटीत ६१९ आणि वनडेत ३३७ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.

भारतीय संघाची भिंत अशी ओळख असलेल्या राहुल द्रविडला (Rahul Dravid) आयसीसीने २०१८ मध्ये 'आयसीसी हॉल ऑफ फेम'मध्ये स्थान दिले.

२०१९ मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) या खास क्लबमध्ये समावेश झाला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकासह सर्वाधिक धावांचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावे आहे.

२०२१ मध्ये विनू मंकड (Vinoo Mankad) या दिग्गज भारतीय क्रिकेटरचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला होता. विनू मंकड हे कसोटीत हजार धावांसह १०० विकेट्स घेणारे पहिले भारतीय अष्टपैलू खेळाडू आहेत.

२०२३ मध्ये भारतीय महिला संघाच्या पहिल्या कर्णधार डायना एडुलजी (Diana Edulji) यांना 'आयसीसी हॉल ऑफ फेम'मध्ये स्थान देण्यात आले. १८ वनडे आणि ४ कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाचे नेतृत्व करणाऱ्या डायना एडुलजी यांच्या खात्यात १२० आंतरराष्ट्रीय विकेट्स जमा आहेत.

भारताचा माजी स्फोटक सलामीवीर (Virender Sehwag) याची २०२३ मध्ये 'आयसीसी हॉल ऑफ फेम'मध्ये एन्ट्री झाली. सेहवाग हा २००७ मध्ये टी-२० आणि २०११ च्या वनडे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग होता.

२०२४ मध्ये नीतू डेव्हिड (Neetu David) या भारतीय महिला क्रिकेटरचा आयसीसीच्या प्रतिष्ठित खेळाडूंच्या यादीत समावेश झाला होता. भारताकडून १० कसोटी आणि ९७ वनडेत या दिग्गज महिला क्रिकेटरनं १८२ विकेट्स घेतल्या आहेत.

आता महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) चा या यादीत समावेश झाला आहे. आयसीसीच्या व्हाइट बॉल क्रिकेट स्पर्धेतील सर्वच्या सर्व तीन ट्रॉफी जिंकणारा धोनी हा क्रिकेट जगतातील एकमेव कर्णधार आहे.