Join us

कसोटी संघात गुजरातचा भरणा; MI कडून फक्त बुमराह! RCB अन् KKR च्या एकाही नाही संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 21:50 IST

Open in App
1 / 10

इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाने शुबमन गिलकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवलीआहे.

2 / 10

आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करणाऱ्या शुबमन गिलकडे आता भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद आले आहे. याचा फायदा या संघातून खेळणाऱ्या खेळाडूंनाही झाल्याचे दिसते. इंग्लंड दौऱ्यातील टीम इंडियात शुबमन गिलसह गुजरातच्या ताफ्यातील वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि साई सुदर्शन पाच जणांना संधी मिळाली आहे.

3 / 10

आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील लोकेश राहुल, कुलदीप यावद आणि करुण नायर कसोटी संघाचा भाग आहेत.

4 / 10

लखनौ सुपर जाएट्स संघाचा कर्णधार रिषभ पंत हा कसोटीत टीम इंडियाचा उप-कर्णधार झालाय. त्याच्याशिवाय या संघातील शार्दुल ठाकूर आणि आकाश दीप यांचा इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियात संधी मिळालीये.

5 / 10

राजस्थान रॉयल्सच्या संघातील यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जेरल यांना भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यात यश आल आहे.

6 / 10

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील एकमेव जसप्रीत बुमराह कसोटी संघाचा भाग आहे.

7 / 10

चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातून रविंद्र जडेजाला कसोटी संघात स्थान मिळाले आहे. तो कसोटी क्रमवारीत ऑलराउंडरच्या गटात टॉपला आहे.

8 / 10

पंजाब किंग्जच्या ताफ्यातील अर्शदीप सिंगला कसोटी संघात संधी देण्यात आलीये.

9 / 10

सनरायझर्स हैदराबदाच्या ताफ्यातील नितीश कुमार रेड्डीनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात छाप सोडली होती. तोही इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघाचा भाग आहे.

10 / 10

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातील एकही खेळाडू टीम इंडियाचा भाग नाही.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारतीय क्रिकेट संघइंडियन प्रिमियर लीग २०२५शुभमन गिलयशस्वी जैस्वालजसप्रित बुमराहरवींद्र जडेजावॉशिंग्टन सुंदरमोहम्मद सिराजलोकेश राहुलकुलदीप यादव